Sameer Bhujbal : सुहास कांदेंना धक्का, पक्षाने समीर भुजबळांचा राजीनामा नाकारला

NCP denies Samir Bhujbal's resignation, contradicting Suhas Kande’s claims : समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा व मुंबई शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केली होती.
Sameer Bhujbal & Suhas Kande
Sameer Bhujbal & Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

Nashik politics : विधानसभा निवडणुकीवेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेना(शिंदे गट)च्या वाट्याला गेली होती. त्यामुळे तिथे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली. मात्र समीर भुजबळ यांनी महायुतीचा धर्म मोडू नये म्हणून राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा व मुंबई शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केली होती.

निवडणुकीत समीर भुजबळ यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतरही मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या काही कार्यक्रमांना समीर भुजबळ हजर होते. त्यामुळे नक्की पक्षाने समीर भुजबळांचा राजीनामा स्विकारला आहे किंवा नाही याबाबत संभ्रम होता. पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनीही अधिकृतपणे भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. त्यामुळे समीर भुजबळांचा राजीनामा राजकीय स्टंट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

मात्र, शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी समीर भुजबळांचा राजीनामा पक्षाने नाकारल्याची अधिकृतपणे माहिती दिली. तसेच समीर भुजबळांनी पूर्वीप्रमाणेच पक्षात कार्यरत व्हावे अशा सूचना तटकरे यांनी केल्या आहेत. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळांच्या खांद्यावर त्यांनी नाशिकची जबाबदारी त्यांनी सोपवली.

Sameer Bhujbal & Suhas Kande
Sunil Tatkare Politics: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सूत्रे छगन भुजबळांकडे!

यावेळी समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाविषयी तटकरे यांनी स्तुतिसुमने उधळली. 'ते' हार्डवर्कर आहेत आणि कोणताही कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडतात. नाशिकमध्ये त्यांच्या कार्याची चुणूक आम्ही पाहिली आहे. पक्ष स्थापनेच्या काळातील शिवाजी पार्कवरील ऐतिहासिक सभेच्या आयोजनात त्यांनी ग्रेट शॉमन अशी ओळख निर्माण केली होती. असे गौरवोद्गार तटकरे यांनी काढले. समीर भुजबळ अनुभव नेते असून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी त्यांच्यावर लवकरच विशेष जबाबदारी सोपविली जाईल असं तटकरे म्हणाले.

Sameer Bhujbal & Suhas Kande
Devendra Fadnavis Politics : एकनाथ शिंदे धास्तावले, शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर फडणवीसांचा गृहविभाग ठेवणार 'वॉच'

दरम्यान मध्यंतरी समीर भुजबळ यांच्यासह छगन भुजबळ यांनीही समीर भुजबळ यांनी राजीनामा दिला असला तरी पक्षाने तो स्विकारलेला नाही असे स्पष्ट केले होते. मात्र त्यावरुन सुहास कांदे यांनी समीर भुजबळांवर टीका केली होती.

समीर भुजबळ यांनी महायुतीचा धर्म मोडून उमेदवारी केल्याने पक्षातून अजित पवारांनी त्यांची हकालपट्टी केली आहे. महायुतीत तसं ठरलंच होतं की जो युतीचा धर्म मोडेल त्याच्यावर पक्ष कारवाई करेल त्यानुसार समीर भुजबळांची हकालपट्टी केली आहे. शिवाय महायुतीच्या विरोधात जावून ज्यांनी उमेदवारी केली अशांना पक्षात पुन्हा घेण्यासाठी कोणतीही पॉलीसी महायुतीत ठरलेली नाही असा दावा कांदे यांनी केला होता. मात्र आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्वत: समीर भुजबळांचा राजीनामा नाकारल्याची माहिती दिल्याने, सुहास कांदे यांचे दावे फेल ठरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com