

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीसह मित्रपक्षांचा धुव्वा उडवत स्वबळावर एकहाती सत्ता मिळवली आहे. १२२ पैकी एकट्या भाजपने 72 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले असून भाजपचा महापौर बसणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सगळे विजयाचा आनंद साजरा करत असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र भाजपला डिवचण्याचं काम केलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या एक्स अंकाउटवरुन मंत्री गिरीश महाजन व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट करुन खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे निकालानंतरही राजकीय आरोप–प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर ७२ जागा जिंकल्या. नाशिक मध्ये एकुण ३१ प्रभाग आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 30 मधील ड गटाचा निकाल विशेष चर्चेचा ठरला. या प्रभागात भाजपचे अजिंक्य साने हे निवडून आले आहेत. या निकालावरून आमदार राहुल ढिकले आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्र सोडलं आहे.
राऊतांची पोस्ट काय?
(आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार) असं शिर्षक देऊन संजय राऊत यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन व राहुल ढिकले यांच्यातील संभाषणावरुन लिहलं आहे की, राहुल ढिकले : साने निवडून आला म्हणजे अवघड आहे. तुमची कृपा.
गिरीश महाजन : मुसलमानांना मुळे झाला *चिपड्या* बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना काय महंतो/ अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो
आमदार बाई भेटू देत नवती
राहुल ढिकले व गिरीश महाजन यांच्यात झालेले संभाषणाचा व्हिडीओ संजय राऊत यांनी शेअर केला आहे. त्यामुळे आता मंत्री महाजन किंवा आमदार राहुल ढिकले यांच्याकडून या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रभाग 30 मधील निवडणुकीत नेमकं काय घडलं?
प्रभाग 30 मध्ये भाजपने अ, ब, क, ड या तीन्ही गटात आपले उमेदवार उतवरले होते. ड गटात भाजपचे अजिंक्य साने व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर देशमुख यांच्यात काट्याची टक्कर झाली. भाजपच्या साने यांनी शिंदे गटाचे उमेदवार सागर देशमुख यांचा अवघ्या सव्वातीनशे मतांनी पराभव केला. या प्रभागात भाजपने तिकीट नाकारल्याने नाराज झालेले माजी नगरसेवक सतीश सोनवणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. मात्र त्यांना केवळ चार हजार मते मिळाली. याच प्रभागात एमआयएमच्या उमेदवाराने सुमारे साडेचार हजार मते घेतली. राजकीय जाणकारांच्या मते, या प्रभागात एमआयएमच्या उमेदवारामुळे मतविभाजन झाले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे सागर देशमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश सोनवणे यांचा पराभव झाला. सागर देशमुख यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मुस्लीम बहुल भागातून त्यांना अपेक्षित मते मिळणार नाहीत, असा अंदाज होता, तो अचूक ठरल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.