Sudhakar Badgujar : कमळ हाती घेताच बडगुजर झाले 'निष्पाप', बावनकुळेंना दिला खास शब्द

Sudhakar Badgujar declared himself innocent after joining BJP and pledged loyalty to Chandrashekhar Bawankule's leadership. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे.
Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama
Published on
Updated on

Nashik politics update : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज मंगळवार (दि. १७) त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचीच चर्चा सुरु होती. भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या प्रवेशाला विरोध होता. मात्र हा विरोध डावलून बडगुजर हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सकाळी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही असं म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीच बडगुजरांनी कमळ हाती घेतलं. यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश तंतोतंत पाळेन, निष्ठेने काम करेन असा शब्द बडगुजर यांनी त्यांना दिला.

बावनकुळे यांचे मकाऊतील कसिनो बारमधील फोटो बडगुजर यांनीची खासदार संजय राऊतांना पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे या प्रवेशसोहळ्याला बावनकुळे हजर राहतील किंवा नाही याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी बावनकुळे यांना फोनकरुन बोलावून घेतल्याचे सांगितले जात आहे.

Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar : बडगुजरांच्या प्रवेशाबाबत मुंबईतून मध्य रात्रीच आला आदेश, नाशिकमध्ये फोन खणाणला, नक्की काय घडलं?

भाजपचा गमछा गळ्यात घातल्यानंतर व कमळ हाती घेतल्यानंतर बडगुजर यांनी लगेचच 'मी निष्पाप आहे' असं सांगितलं. ते म्हणाले, आपल्यापर्यंत पक्षापर्यंत कुणी काय माहिती दिली हे मला माहिती नाही, पंरतु मी निष्पाप आहे. कोरोना काळात कोणी बाहेर येत नसताना मी काम केलं. परंतु नियतीने माझ्यावर घाला घातला. माझ्यावर कारवाई झाली. ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो, महापालिका निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होईल असा इशारा त्यांनी दिला.

Sudhakar Badgujar
Seema Hiray on Sudhakar Badgujar : 'देशद्रोही आणि बंडखोर लोकांबरोबर काम करणं अवघड, आणखी काय म्हणाल्या सीमा हिरे..?

मला आदराने पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. गिरीशभाऊ संकटमोचक आहेत, आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला. गिरीश भाऊ आपण, बावनकुळे साहेब, रविंद्र चव्हाण साहेब जे मार्गदर्शन करणार त्याचे आपण पालन करू, निष्ठेने काम करु असा शब्द बडगुजर यांनी भाषण करताना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com