नाशिक: नाशिक औष्णिक वीज निर्मिती केंद्राचा वापर 'युज अँड थ्रो' सारखा होत आहे. एकीकडे महानिर्मिती अडचणीत असेल तेव्हा येथील संच सुरू ठेवले जातात. गरज संपली की दोन संच बंद ठेवले जातात. फक्त ग्रीड साठी एक संच सुरू ठेवायचा असे सध्याचे धोरण असल्याने या केंद्राचा वापर महावितरण कंपनीकडून सुरू आहे.
नाशिक औष्णिक वीज केंद्रात सध्याच्या मितीला २१० मेगा वॅट चे ३ संचमधून ६३० मेगा वॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. मात्र ज्यावेळी वीजेची मागणी वाढते त्यावेळी किंवा इतर ठिकाणच्या संचाना अडचणी असल्यास येथील दोन किंवा तीन संचांमधून निर्मिती केली जाते. मात्र मागणी कमी झाली की, लगेच झिरो शेड्युल दिले जाते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा मागणी वाढली तेव्हा १ नोव्हेंबरला पहाटे दुसरा संच सुरू करण्यात आला. ३ तारखेला रात्री आठला म्हणजेच दोन दिवसातच संच बंद करण्याचे आदेश आले.
एकीकडे खासगी वीज केंद्रांकडून जास्त वीज खरेदी केली जाते तर दुसरीकडेमहानिर्मितीच्या संचाना बॅकिंग डाऊन दिले जाते. नाशिक सारख्या चाळिशीतही जोमाने चालणारे संच गरज संपली की वीज महाग पडते चे कारण दाखवून झिरो शेड्युल दिले जाते.
एकंदरीत गरज असेल तेव्हा नाशिक चे संच सुरू गरज संपली की दोन संच बंद व फक्त एक संचातुन निर्मिती सुरू असे सध्या सुरू आहे.
गेल्या वर्षी नाशिक चे तीन ही संच बंद असतांना ग्रीड फेल होऊन मुंबई काळोखात गेली होती. त्याकाळात तात्काळ येथील संच टप्याटप्याने सुरू करण्यात आले होते. नाशिकचे महत्व अनेकदा अधोरेखित होऊनही येथील प्रस्तावित बदली संचास फक्त राजकीय उदासीनतेमुळे चालना मिळत नाही आहे.
...
वीज क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ग्रीड स्टेबिलिटीसाठी नाशिक औष्णिक वीज केंद्र सुरू असणे गरजेचे आहे. असे असतांनाही फक्त राजकीय उदासीनतेमुळे येथील बदली संच रखडला आहे. तर नाईलाज म्हणून एक संचातुन वीज निर्मिती सुरू आहे.
विनायक हारक, सचिव. संघर्ष समिती.
...
वीज निर्मितीचे अनेक उच्चांक व कोट्यवधींची बचत करणाऱ्या नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संचांचा वापर गरजेपुरता केला जात आहे. राज्यात सगळीकडे रिप्लेसमेंट संच देण्यात आले असताना नाशिकवरच अन्याय का?
प्रभाकर रेवगडे, झोन अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कामगार संघटना
...
एम. ओ. डी. रेट नुसार कुठले संच चालू ठेवायचे वा बंद ठेवायचे याचे निर्देश कळवा येथील लोड मॅनेजमेंट सेल येथून दिले जातात. त्यानुसार संच सुरू अथवा बंद ठेवले जातात.
नवनाथ शिंदे, मुख्य अभियंता, नाशिक औष्णिक वीज केंद्र.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.