Satyajeet Tambe And Amol Khatal : रेल्वे मार्ग बदलला, कट्टर विरोधकांना एकत्र आणलं? तांबे खताळांचा संपर्क वाढला!

Nashik–Pune Railway Route Meeting in Sangamner Satyajeet Tambe to Invite Shiv Sena Amol Khatal : नाशिक-पुणे रेल्वे मार्गावर सोमवारी होणाऱ्या बैठकीला आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे फोन करणार आहेत.
Satyajeet Tambe And Amol Khatal 1
Satyajeet Tambe And Amol Khatal 1Sarkarnama
Published on
Updated on

Sangamner political meeting : नाशिक-पुणे रेल्वेचा बदलेला मार्गावरून संगमनेरकर आक्रमक झाले आहेत. नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी जनआंदोलन उभारण्याचा निश्चित केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी देखील संगमनेरकरांच्या विकासासाठी कोणतीही तडतोड करणार नसल्याची भूमिका घेत, रेल्वेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

केंद्र सरकारने रेल्वे मार्ग संगमनेरमधूनच नेण्याचा निर्णय करावा, यासाठी घारगाव इथं सोमवारी (ता. 22) बैठक बोलावली आहे. आजी-माजी खासदार, आमदार, सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांचे पदाधिकारी यांना सत्यजीत तांबे स्वतः निमंत्रण पाठवलीत. या बैठकीला आमदार अमोल खताळ यांना आमंत्रण देण्यासाठी सत्यजीत तांबे स्वतः फोन करणार आहेत. कट्टर विरोधक रेल्वेनिमित्ताने एकत्र येत असल्याची चर्चा आता स्थानिक पातळीवर रंगलीय.

रेल्वे मार्गासाठी विधानभवनात पहिली बैठक झाली होती. त्यावेळी अमोल खताळ देखील सहभागी झाले होते. पण स्थानिक पातळीवर अमोल खताळ यांच्याबरोबर सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या उपस्थित पहिलीच बैठक होत असल्याने उत्सुकता वाढली आहे. कट्टर विरोधक एकत्र येणार असल्याने, स्थानिकांना देखील या बैठकीची उत्सुकता आहे.

सत्यजीत तांबे म्हणाले, "नाशिक (Nashik)-पुणे रेल्वे प्रकल्पासंदर्भात यापूर्वी विधानभवनात पहिली बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी मी स्वतः आमदार अमोल खताळ यांना फोन करून बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यानुसार आमदार खताळ त्या बैठकीस उपस्थित राहिले होते."

Satyajeet Tambe And Amol Khatal 1
Nilesh Lanke post controversy : PM मोदींची भेट, उत्साहात शेअर केली पोस्ट, पुढे तीन वेळा एडिट; लंकेंकडून डॅमेज कंट्रोल?

सोशल वाॅर

विधान भवनातील त्या बैठकीदरम्यान नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावे व छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली होती. त्या पोस्टमध्ये खताळ यांचे छायाचित्रही दिसतात. यानंतर आमदार खताळ यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमधून माझे छायाचित्र वगळले होते. रेल्वे प्रकल्पासारख्या महत्त्वाच्या जनहिताच्या विषयात श्रेय घेण्याचा किंवा कोणाला वगळण्याचा प्रश्‍न येऊ नये. मोठेपणा दाखवण्यात मला कोणतीही अडचण नाही. मात्र, सत्य जनतेसमोर आले पाहिजे, असे स्पष्ट मत आमदार तांबे यांनी व्यक्त केले.

Satyajeet Tambe And Amol Khatal 1
TOP 10 News: राज्यातील 10 प्रतिष्ठेच्या लढती,अजित पवारांच्या आमदाराला कारनं उडवलं,राणे बंधूमध्ये कोणाची सरशी होणार?

रेल्वेसाठी राजकारण दूर ठेवणार

दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक–पुणे रेल्वे मार्गाचा प्रश्‍न केवळ प्रवास किंवा वाहतुकीपुरता मर्यादित नसून, तो संगमनेरच्या अस्मितेचा, सर्वांगीण विकासाचा आणि भविष्यातील प्रगतीचा प्रश्‍न आहे. संगमनेरच्या दृष्टीने रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे. या विषयावर राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय पातळीवर एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले.

बैठकीस उपस्थित राहणार; खताळ

या प्रश्‍नासाठी कोणीही पुढे येत असेल, तर मीही राजकारण बाजूला ठेवून या लढ्यात सहभागी होईल. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेरमार्गेच कसा जाईल, यासाठी माझा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहे. यासंदर्भात घारगाव (ता. संगमनेर) इथं सोमवारी (ता.22) होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीस स्वतः उपस्थित राहणार आहे. या बैठकीत रेल्वे मार्गाबाबत सखोल चर्चा होऊन संगमनेरच्या हिताचा ठोस निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही खताळ यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com