Nitesh Karale Master : नाशिकच्या साधूंविषयी नको ते बोलले, कराळे मास्तरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Karale Master On Nashik Kumbh Mela : साधूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन नितेश कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराळे मास्तरांवर त्यामुळे अटकेची टांगती तलवार आहे.
Nitesh Karale Master
Nitesh Karale MasterSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व खदखद फेम नितेश कराळे उर्फ कराळे मास्तर हे आपल्या बेधडक व बेफाम वक्तव्यांनी कायम चर्चेत असतात. नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नितेश कराळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून त्यामुळे कराळे मास्तरांच्या अडचणीत भर पडली आहे.

नाशिकमध्ये २०२७ कुंभमेळा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर साधूंविषयी कराळे यांनी अपशब्द वापरल्याने ते आता अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा जो खर्च करण्यात येत आहे तो फालतू आहे. कुंभमेळ्यात साधू हे गांजा फुंकण्यासाठी येतात असं कराळे मास्तरांनी म्हटलं आहे.

कराळे मास्तरांच्या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत विश्‍व हिंदू परिषेदेने वर्धा येथे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कराळे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Nitesh Karale Master
Sinnar Nagarparishad Election : भावाच्या नावावर मतदान करायला आला आणि फसला, नाशिकच्या सिन्नरमध्ये बोगस मतदार पकडला

कुंभमेळ्यात येणारे साधू हे संत नसून, ते गांजा फुकायला कुंभमेळ्यात येतात. जर हे सिद्ध झाले नाही तर १० लाख रुपयांची पैज लावायला मी तयार असल्याचे आव्हान त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. सरकारने यावरून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गुन्हा दाखल होताच कराळे मास्तर यांनी सरकारला आरसा दाखवला. म्हणाले जे साधू कुंभमेळ्यात येतात. गांजा फुकतात अशांसाठी सरकार २५ हजार कोटी खर्च करु शकते पण ज्यांच्यामुळे या देशाचे भवितव्य घडणार आहे. असे गोरगरिबाचे पोरं जे जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकतात. त्यांच्या वार्षिक खर्चासाठी सरकारकडे २००० करोड नाही. या देशाच्या भवितव्यासाठी सरकार २००० करोड खर्च करु शकत नाही. हा माझा देवा भाऊले प्रश्न असल्याचे कराळे मास्तर म्हणाले.

Nitesh Karale Master
Girish Mahajan : गिरीश महाजनांकडून सारवासारव, आता म्हणतात.. आमदार ढिकले व फरांदे दोघांनाही सारखाच अधिकार

मी चुकीचे काही बोललेलो नाही. त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही. साधू गांजा पितात, असे म्हटल्याने धार्मिक भावना कशा दुखावतात, हे मला समजत नाही. 25 हजार कोटींपैकी किमान 2 हजार कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या शाळांवर खर्च केले तर ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या शाळांचे चित्र बदलेल आणि गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल असा मुद्दा कराळे मास्तरांनी मांडला. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीवरही नीतेश कराळे यांनी तीव्र आक्षेप घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com