Nashik Shiv Sena : 26 नगरसेवक तरी खुर्च्या रिकाम्या; मंत्री उदय सामंत, सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना फटकारलं

Uday Samant address Shiv Sena office-bearers : नाशिक जिल्ह्याचे संपर्कमंत्री झाल्यानंतर सामंत यांच्या उपस्थितीत पक्षाचा पहिलाच मेळावा झाला. परंतु अपेक्षित कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थितीत नव्हते.
Suhas Kande , Uday Samant
Suhas Kande , Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : उद्योगमंत्री व नाशिक जिल्ह्याचे शिवसेना संपर्कमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा बुधवारी (दि. ६) नाशिकमध्ये पार पडला. यावेळी सामंत यांनी पक्षातील गटबाजी, मतभेद आणि संघटनात्मक कमकुवतपणावर थेट प्रहार केला.

सामंत हे शिवसेना संपर्कमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले होते. सातपूर येथील डेमोक्रॉसी येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. नाशिक महापालिकेत शिवसेनेचे २६ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र असे असतानाही अपेक्षित कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित नसल्यामुळे अनेक खूर्च्या रिकाम्याच होत्या, त्यावर मंत्री सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची उदासिनताही सामंत यांनी अधोरेखित केली.

तसेच यावेळी, लोकसभा संपर्कप्रमुख आमदार सुहास कांदे यांनी देखील बैठकीतील अल्प उपस्थिती व रिकाम्या खूर्च्या पाहून संताप व्यक्त केला. शिवसेनेचे संघटन प्रत्यक्षात कमी आणि कागदावरच अधिक दिसत असल्याचे आमदार कांदे म्हणाले. अशा महत्वाच्या मेळाव्याला पदाधिकारीच येणार नसतील तर सामान्यांपर्यंत आपण कधी पोहोचणार असा सवाल कांदे यांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर कागदावरचे नियोजन प्रत्यक्षात आणावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.

म्हणून बालेकिल्ला बनत नाही

आपसातील मतभेद आणि गटबाजीमुळे जिल्ह्यात पक्ष संघटना कमकुवत बनत आहे. त्यामुळेच नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनत नाही, हे दुर्दैवी आहे' अशी खंत सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. माझ्यामुळे पक्ष नाही, तर पक्षामुळे मी आहे, ही भावना प्रत्येक पदाधिकाऱ्याने मनात ठेवली पाहिजे. पक्षाची आचारसंहिता सर्वांसाठी समान असून ती जपल्यास जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मतभेद बाजूला ठेवून संघटना उभारणीसाठी झोकून देण्याचे आवाहन त्यांनी केलं.

मुंबईवारीवरुन सल्ला

राज्यातील ५० टक्के जिल्हाप्रमुख सोमवार ते बुधवार मुंबईतच तळ ठोकून असतात. मुंबईत जायला हरकत नाही, परंतु, ती मुंबईवारी पक्षसंघटनेसाठी उपयोगी पडावी असा टोला सामंत यांनी लगावला. या मेळाव्याला पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, उपमहापौर विलास शिंदे, माजी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार निर्मला गावित, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, युवासेनेच्या हर्षदा गायकर, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, नितीन भोसले, काशिनाथ मेंगाळ आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com