Arvind Jagtap : 'एक मोठा मंत्री काढून त्याजागी दहा पीए ठेवले तरी..' तपोवनातील वृक्षतोडीवरुन लेखक अरविंद जगताप संतापले

Tapovan Tree Cutting Issue : लेखक व पटकथाकार अरविंद जगताप यांनी नाशिक तपोवन वृक्ष तोड प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी फेसबुकवर केलेली एक पोस्ट दिवसभर चर्चेत राहिली.
Arvind Jagtap
Arvind Jagtap Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची राहण्याची सोय करण्यासाठी तपोवनात साधूग्राम उभारण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी १८०० झाडी तोडली जाणार असून याविरोधात पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरु आहे. जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवन वाचविण्यासाठी पुढाकार घेतला असून पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत पर्यावरणप्रेमींना अनेकांची साथ मिळत आहे. अगदी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रोहित पवार या राजकीय नेत्यांनीही वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला आहे. आता त्यात सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून आवाज उठवत आहेत. प्रसिद्ध लेखक व पटकथाकार अरविंद जगताप यांनी एक मार्मिक पोस्ट केली असून राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

एक एक मोठं झाड तोडून दहा दहा नवी रोपं लावायची असतील, तर मग एक एक मोठा मंत्री काढून त्याजागी दहा दहा पीए ठेवले तरी काय हरकत आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ही पोस्ट नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतली असून वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे. तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला सेलिब्रेटींनी जाहीर पाठींबा दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांसह अनेक संस्था व संघटनांनीही आंदोलनात उडी घेतली आहे.

तपोवनातील वृक्षप्रेमींच्या आंदोलनाला जनमनाचा पाठिंबा वाढू लागला आहे. या सगळ्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टिका होत आहे. सयाजी शिंदे यांनी तपोवनात येऊन गिरीश महाजन यांना आव्हान दिलं आहे. एकाही झाडाला हातू लावू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. महाजन तुमचे व माझी व्यक्तिगत दुश्मनी नाही पण झाली तरी काही हरकत नाही या भाषेत सयाजी शिंदेंनी महाजनांना खडेबोल सुनावले.

उद्धव ठाकरे यांनी या वृक्षतोडीला विरोध केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी तपोवनात दाखल होत जोरदार आंदोलन छेडले. हातात निषेध फलक घेऊन राज्य सरकार व महापालिकेविरोधात त्यांनी घोषणा दिल्या. पर्यावरण प्रेमी याठिकाणी ठाण मांडून आहे. तेथील जागेवर प्रस्तावित एक्झिबिशन सेंटरला विरोध करत, येथील वृक्षांची कत्तल होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतील आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com