Nashik Tapowan: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात मोठी अपडेट; राष्ट्रीय हरित लवादाचा महापालिका प्रशासनाला दणका

Tapovan Tree Cutting Issues: नाशिक महानगरपालिका प्रशासन तपोवनमधील साधूग्रामसाठी आग्रही भूमिकेत आहे. याउलट तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही असा पवित्रा पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे. पण हा विरोध झुगारत पालिका प्रशासनानं सुरू केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रीय हरित लवादानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Nashik Tapowan  (1).jpg
Nashik Tapowan (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटी येथील तपोवन भागात साधूग्राम उभारण्यात येणार आहे. यासाठी नाशिक (Nashik) महानगरपालिकेकडून या भागातील तब्बल 1800 वृक्षतोड सुरू केली. या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. अशातच आता राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) मोठा महापालिकेला मोठा झटका दिला आहे.

नाशिक महानगरपालिका प्रशासन तपोवनमधील साधूग्रामसाठी आग्रही भूमिकेत आहे. याउलट तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही असा पवित्रा पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे. पण हा विरोध झुगारत पालिका प्रशासनानं सुरू केलेल्या कारवाईला राष्ट्रीय हरित लवादानं 15 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने (NGT)तपोवनातील वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देतानाच जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तपोवनमध्ये कोणतीही वृक्षतोड न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करणारी याचिका श्रीराम पिंगळे यांनी दाखल केली होती.

नाशिक महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाला राष्ट्रीय हरित लवादानं फटकारतानाच संबंधित वृक्षतोड कशासाठी आवश्यक आहे, त्याबाबत उपाययोजना व वृक्षांची गणना करण्यात आली का अशी विचारणाही केली. तसेच या सर्व बाबींचा एक सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सूचनाही एनजीटीनं समितीला दिले आहेत.

Nashik Tapowan  (1).jpg
ZP Teachers news : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; ZP शाळांमधील बदल्यांसाठीचे सर्व GR रद्द करण्याची सरकारची तयारी, मंत्र्यांची विधानसभेत माहिती

राष्ट्रीय हरित लवादानं याचिकाकर्त्यांनाही समितीच्या अहवालाची नोटीस देण्याबाबत आदेश दिले आहेत. लवादानं तपोवनासंदर्भात दिलेला निर्णय पर्यावरणाच्या प्रेमींच्या लढ्याला तात्पुरतं का होईना यश असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com