Shubhangi Patil: उद्धव ठाकरेंनी बंडखोरी थोपवली, शुभांगी पाटलांनी घेतला मोठा निर्णय!

Shivsena UBT Shubhangi Patil : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Shivsena UBT Shubhangi Patil
Shivsena UBT Shubhangi Patilsarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (शुक्रवार) शेवटचा दिवस आहे. येथून शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारा विरोधातील बंडखोरी चर्चेत होती. त्यामुळे राजकारण तापले होते. बंडखोरीमुळे ठाकरेंच्या उमेदवाराला फटका बसण्याची देखील शक्यता होती. मात्र, ही बंडखोरी थोपवण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मात्र शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी होणार हे स्पष्ट झाले होते.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी या निवडणुकीत हस्तक्षेप केला. त्यानंतर धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पक्ष निष्ठेसाठी उमेदवारी न करण्याचा निर्णय जाहीर केला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या आगामी प्रचाराबाबत आज (शुक्रवारी) धुळे येथे त्यांच्या उपस्थितीत शिक्षकांची बैठक होणार आहे.

Shivsena UBT Shubhangi Patil
Konkan Graduate Election : कोकण पदवीधरमधून मनसेची माघार, भाजपला पुन्हा 'बिनशर्त' पाठिंबा?

शुभांगी पाटील यांचा विभागातील शिक्षकांची त्या संपर्क आहेत. त्यांनी या क्षेत्रात गेली दहा वर्ष सातत्याने काम केले आहे. विविध प्रश्नांवर त्या शासनाविरोधात आक्रमक असतात. विधानसभेच्या पदवीधर मतदारसंघात त्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. त्या निवडणुकीत त्यांना ४९ हजार मते मिळाली होती.

शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत. त्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर पाठपुरावा केला आहे. राज्यातील 63 हजार विनावेतन शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सोडविण्याचा त्यांचा दावा आहे. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात सुमारे 30 हजार शिक्षक या संघटनेची संबंधित आहेत. आता पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गुळवे यांचा प्रचार करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलासा मिळणार आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com