Nashik Kumbh Mela : आधी दोन, मग पाच अन् आता सात कोटी! नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यांच्या निधीत वाढ, जुलैपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आव्हान

Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत पाच कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता. आता त्यातही वाढ झाली असून सात कोटींवर हा निधी पोहोचला आहे.
Sinhastha Kumbh Mela Website
Sinhastha Kumbh Mela WebsiteSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Kumbh Mela : ध्वजारोहण सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलमय पर्वाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आता त्र्यंबकेश्‍वर आणि नाशिकमधील आखाड्यांच्या कामांना जोमाने सुरुवात होणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथील दहा शैव आखाडे व नाशिकमधील तीन वैष्णव आखाड्यांना प्रत्येकी सात कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीतून आखाड्याअंतर्गत कामे केली जाणार असून ही कामे जुलैपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास आखाडा परिषदेने व्यक्त केला आहे.

आखाड्यांना पूर्वी प्रत्येकी दोन कोटींचा निधी देण्यात आला होता. त्यानंतर आखाड्यांनी निधी वाढवून मिळण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत आखाड्यांनी पाच कोटींचा निधी मंजूर करून घेतला. आता त्यातही वाढ झाली असून सात कोटींवर हा निधी पोहोचल्याचे साधू-महंतांनी सांगितले.

शासनाने कामांना उशिराने सुरुवात केल्यामुळे अजूनही कामे अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाहीत. यापुढे किमान कामांना गती मिळाल्यास जुलैपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील आणि सिंहस्थ कुंभमेळा व्यवस्थितरीत्या पार पडले असा विश्वास अखिल भारतीय आखाडा परिषदचे (त्र्यंबकेश्वर) कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनी व्यक्त केला आहे.

त्र्यंबकेश्‍वरच्या आखाड्यांनी कोणती कामे करायची आहे, त्याची यादी नगरपालिका प्रशासनाकडे सुपुर्द केली आहे. तसेच कुंभमेळा प्राधिकरणामार्फत ही कामे मंजूर केली जातील. आखाड्याअंतर्गत होणाऱ्या कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार असून जुलै २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान राहणार आहे.

Sinhastha Kumbh Mela Website
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांची गैरसोय, विषय थेट महासभेत गाजणार?

ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला प्रारंभ झाल्यानंतर आता पुढील सात ते आठ महिने विकास कामांवर भर दिला जाणार आहे. जुलैमध्ये आखाड्यांचे ध्वजारोहण होणार आहे. तोर्यंत शासनाने सगळी कामे पूर्ण करावी लागणार आहे. त्यामध्ये नवीन घाटांची निर्मिती, रस्त्यांची अपूर्ण कामे, दर्शनपथ, अतिक्रमण व पाणी पुरवठा योजनांची कामे या कालावधीत पूर्ण करण्याचे प्रमुख आव्हान प्रशासनासमोर आहे.

Sinhastha Kumbh Mela Website
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या कामांना सरकारचा ‘बूस्टर’ ; आणखी 1800 कोटींचा निधी, नगरविकास विभागाकडून घोषणा

ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी विकास कामांची पाहणी करताना कामांच्या संथगतीमुळे साधू-महंतानी नाराजी व्यक्त केली. साधू-महंतानी कामात प्रगती दाखवा अन्यथा कुंभमेळ्याला येण्याबाबत विचार करावा लागेल या शब्दात प्रशासनाला इशारा दिला. त्यामुळे आता येणाऱ्या काळात अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे प्रमुख आव्हान प्रशासनासमोर राहील. विशेषत आखाड्यांनी सुचविलेली कामे वेळेत पूर्ण कशी होतील, याचा विचार प्रामुख्याने करावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.