Girish Mahajan : एक नाव राहिलं अन् महिला कर्मचारी थेट गिरीश महाजनांना भिडली : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan republic day controversy : 26 जानेवारीच्या कार्यक्रमात नाव वगळल्याने संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारला, कार्यक्रमात गोंधळ उडाला.
Girish Mahajan : एक नाव राहिलं अन् महिला कर्मचारी थेट गिरीश महाजनांना भिडली : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Published on
Updated on

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय सोहळ्याला अचानक गालबोट लागले आहे. देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्ये मात्र एका घटनेमुळे कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान वनविभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट आक्षेप घेत जोरदार संताप व्यक्त केला.

नाशिकमध्ये किल्ले मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडत होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करत भाषण केले. मात्र, या भाषणात संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने कार्यक्रमात उपस्थित असलेल्या माधवी जाधव यांनी असंतोष व्यक्त केला. त्यांनी भर सभेत उभं राहून प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Girish Mahajan : एक नाव राहिलं अन् महिला कर्मचारी थेट गिरीश महाजनांना भिडली : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Bharat Gogawale : अखेर भरतशेठ गोगावलेंना 'तो' मान मिळालाच... 26 जानेवारीच्या परेडसाठी दिसले खास लूकमध्ये

माधवी जाधव यांनी आपल्या भावना अत्यंत तीव्र शब्दांत मांडल्या. "मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करायचं तर करा. पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही". पालकमंत्री हे संविधानामुळे आहेत, कोणताही जातीभेद नाही. सर्व समानता संविधानामुळे आहे. पण, जे लोकं संविधानाला कारणीभूत नाहीत, लोकशाहीला कारणीभूत नाहीत त्यांची नावं वारंवार घेतली.

मात्र, जे संविधानाला कारणीभूत आहेत, प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव का घेतलं जात नाही, असे म्हणत महिला पोलीस कर्मचाऱ्याने तीव्र भावना व्यक्त केल्या. जातीभेद नष्ट होणे, समान अधिकार मिळणे हे सगळे संविधानामुळे शक्य झाले, मात्र लोकशाहीला आणि संविधानाला ज्यांचे योगदान आहे त्यांची नावे दुर्लक्षित केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com