Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्ह्याच्या यशाचा झेंडा राज्यभर फडकला, पंचायत विकास निर्देशांकात मिळवला पहिला क्रमांक

Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्हा परिषदेचा राज्यातील पंचायत विकास निर्देशांक अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
Nashik Zilla Parishad
Nashik Zilla ParishadSarkarnama
Published on
Updated on

Nashik Zilla Parishad : ग्रामविकास विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत आज (दि. २६ ) नाशिक जिल्हा परिषदेचा राज्यातील पंचायत विकास निर्देशांक (Panchayat Advancement Index - PAI) अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. या गौरव सोहळ्यात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) डॉ. वर्षा फडोळ यांसह मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्याचा यशाचा झेंडा राज्यभर फडकला असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.

सन २०२२-२३ च्या मूल्यांकनानुसार नाशिक जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे. तसेच नाशिक पंचायत समितीने राज्यात पहिला क्रमांक, चांदवड पंचायत समितीने नववा क्रमांक मिळवला.

ग्रामपंचायतींच्या स्तरावर नाशिक तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीला राज्यात पाचवा क्रमांक, तर इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला सहावा क्रमांक मिळाला. या सर्व स्वराज्य संस्थांचा देखील कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

Nashik Zilla Parishad
Girish Mahajan Politics : भुसे-भुजबळांना गिरीश महाजनांनी पुन्हा दाखवली 'पॉवर', एका आदेशात महापालिकेची यंत्रणा हलली

सन २०२२-२३ मूल्यांकनानुसार जिल्हा परिषदेस पंचायत विकास निर्देशांकात मिळालेला राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हा संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढेही सातत्याने प्रयत्नशील राहू," असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले.

Nashik Zilla Parishad
Manoj Jarange Patil Agitation: छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून मुंबईत जरांगेच्या आंदोलकांसाठी "एक भाकरी समाजासाठी" उपक्रम!

नाशिक जिल्हापरिषद नेहमीच अग्रेसर

आधुनिक भारताची निर्मिती झाली त्यात पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी १५ पंचायत समिती आणि १,३७३ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नाशिक जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com