Nashik ZP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपची 'व्यूह' रचना, पुढचं जाळं कोणत्या तालुक्यात?

Nashik ZP, Ajit Pawar, BJP strategy : नाशिकमध्ये सात आमदार एकट्या राष्ट्रवादीचे असल्याने पक्षाचे पारडे जड आहे. मात्र राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या तालुक्यांमध्ये भाजपने लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसत आहे.
Nashik ZP Ajit Pawar
Nashik ZP Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यात १५ पैकी सात आमदार एकट्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे असल्याने जिल्हा परिषदेच्या आखाड्यात पक्षाचे पारडे जड आहे. राष्ट्रवादीसोबत निवडणुकीच्या स्पर्धेत येण्यासाठी भाजपनेही आपली ताकद वाढविण्यास सुरुवात केली असून त्यासाठी राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या तालुक्यांवर लक्ष्य केंद्रित केलं आहे.

सुरुवातीला भाजपने शहरात महापालिका निवडणुकीची पूर्ण तयारी केली. शंभर प्लसचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक ते पुरेसे इनकमिंग करुन घेतले. त्यानंतर भाजपने आपला मोर्चा जिल्हापरिषदेच्या निवडणुकीकडे वळवल्याचे दिसते. एक-एक करत भाजप वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये शिरकाव करत असून तेथील मात्तबर मासे आपल्या गळाला लावण्याचे काम सुरु आहे.

भाजपकडून एकप्रकारे राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न दिसतो. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या तालुक्यात किंवा गटात प्राबल्य असलेल्या नेत्यांना गळाला लावून भाजपने त्यादृष्टीने पहिले पाहुल टाकले आहे. त्याची सुरुवात भाजपने राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्रर तालुक्यापासून केली. सिन्नरमध्ये सर्वात आधी कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांना गळाला लावलं. त्यानंतर युवा नेते उदय सांगळे यांनाही प्रवेश दिला.

Nashik ZP Ajit Pawar
Sinnar Politics : सिन्नरमध्ये काका विरुद्ध पुतणी सामना टाळण्यासाठी प्रयत्न, कुणाचा पुढाकार?

त्यासोबतच राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या तालुक्यात भाजपने पाऊल टाकले. दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर व त्यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर यांचा भाजपप्रवेश झाला. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात मंत्री झिरवाळांची कोंडी झाली आहे. तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे.

त्यानंतर आता भाजपने आपले जाळे निफाड तालुक्यात टाकल्याचे समजते. निफाड तालुक्याच्या राजकारणात प्रभाव असलेला व यापूर्वी जिल्हापरिषद अध्यक्ष राहिलेला मोठा नेता भाजप गळाला लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निफाड तालुक्यात तसे भाजपने यतीन कदम यांच्या रुपाने फार आधीच जाळे टाकून ठेवले आहे. परंतु हा मोठा नेता भाजपमध्ये आल्यास निफाड तालुक्यात भाजपची ताकद प्रचंड वाढू शकते.

Nashik ZP Ajit Pawar
Eknath Khadse : युतीसाठी भाजप सोडून सगळे चालणार, एकनाथ खडसेंनी बैठक घेऊन घोषणाच करुन टाकली

भाजपच्या अमृता पवार व यतीन कदम यांनी निफाड तालुक्यात स्वबळाची तयारी सुरु केल्याचे कळते. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे. भाजपने निफाड बरोबरच राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यावरही लक्ष्य केंद्रीत केलं आहे. तिथेही भाजपच्या गुप्त हालचाली सुरु आहेत.

चांदवड व बागलाण तालुक्यात भाजपचा आमदार आहे. त्यामुळे भाजपची ताकद आहेच. परंतु चांदवड तालुक्यातही कॉंग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी खळबळ उडवली आहे. थोडक्यात काय तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एक-एक करत भाजप आपलं जाळं विणत असून पक्षाची ताकद वाढवताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com