Nashirabad Nagar Panchayat Result: राजकारणाला वय नसतं! ना पायात चप्पल ना हातात काठी...अनवाणी प्रचार; 77 वर्षांच्या आजीबाईं झाल्या नगरसेविका

Nashirabad Nagar Panchayat BJP’s Janabai Randhe Wins at 77 : उमेदवारी अर्ज भरल्यापासून जनाबाई या प्रचारासाठी वार्डात अनवाणी फिरत होत्या. मतदारांशी संवाद साधत त्यांच्या परिसरातील समस्या काय आहे, हे समजूत घेत होत्या.
Nashirabad Nagar Panchayat  BJP’s Janabai Randhe Wins at 77
Nashirabad Nagar Panchayat BJP’s Janabai Randhe Wins at 77Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon BJP Politics: प्रत्येक नोकरी अन् व्यवसायात निवृत्तीचे वय निश्चित आहे. पण राजकारण हे एकमेव असे क्षेत्र आहे की जिथे निवृत्तीच्या वयाची कोणतीही सीमा नसते. किंबहुना वाढते वय हेच तिथे क्वालिफिकेशन असते की काय हे सध्याच्या काही नेत्यांचा राजकीय आलेख पाहिला की समजते.

नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात 77 वर्षीय आजीबाईंना विजय मिळवत युवकासाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. वयाचा अमृतमहोत्सव साजरा करुन राजकारणात एन्ट्री करुन नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या जनाबाई रंधे या सर्वांच्या कौतुकाला प्राप्त ठरल्या आहेत. चाळीशीमध्येच नोकरी-व्यवसायात निवृत्त घेणाऱ्यांसाठी आजींबाईं आदर्श ठरल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून त्या विजयी झाल्या आहेत. विजयी झाल्याची घोषणा होताच आजीबाईना अश्रू अनावर झाले. पहिल्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली.

जनाबाई रंधे यांनी भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. नशिराबादमधल्या प्रभाग क्रमांक 7 अ मधून त्यांनी निवडणूक लढवली. त्या विजयी झाल्या आहेत. मतमोजणी केंद्रात विजयी झाल्याची घोषणा झाल्यावर आनंदात त्यांना अश्रू अनावर झाले. जनाबाईंनी आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली.

उमेदवारी अर्ज भरल्यापासून जनाबाई या प्रचारासाठी वार्डात अनवाणी फिरत होत्या. मतदारांशी संवाद साधत त्यांच्या परिसरातील समस्या काय आहे, हे समजूत घेत होत्या. आजींचा हा उत्साह पाहून अनेक मतदार त्यांच्याकडे आकर्षित झाले. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हेही त्यांच्यासाठी प्रचाराला आले होते

Nashirabad Nagar Panchayat  BJP’s Janabai Randhe Wins at 77
Jalgaon Nagar Palika Result: महायुतीच्या होमग्राउंडवरच तीन मंत्री बाद! आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलणार

निवडणूक जाहीर झाल्यावर जनाबाईंच्या सुनबाईंचं नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. पण सासूने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सूनबाईंना माघार घ्यावी लागली.जनाआजींचा मुलगा, नातू सारे कुटुंब प्रचारात होते. गावक-यांनीही 77 वर्षीय आजींच्या शब्दाचा मान देत त्यांच्याबाजून कौल दिला. निवडणूक जिंकल्यावर आजी भावुक झाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com