Dr. Sudhir Tambe; ‘भारत जोडो’तून देश जोडण्याचे काम

नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा जिल्हा कॉंग्रेसतर्फे सत्कार, नियुक्तीपत्रांचे वाटप
Dr. Sudhir Tambe in Congress Meeting
Dr. Sudhir Tambe in Congress MeetingSarkarnama

नाशिक : (Nashik) कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) माध्यमातून विविध क्षेत्रातील अभ्यासक, तज्ञ, युवक, महिला ह्याचा सहभाग तसेच विविध जातीं धर्माचे लोक जोडले गेल्यानेच संबंध देश भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जोडला जात असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी केले. (Bharat Jodo Yatra is a big national connect of all religion)

Dr. Sudhir Tambe in Congress Meeting
Shivsena; शिंदे यांनी दाढीवर हात फिरवला तरी राऊत आडवे होतील!

जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉ. तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा सत्कार व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. तांबे बोलत होते.

Dr. Sudhir Tambe in Congress Meeting
Sanjay Raut; `ते` तर शिवसेनेच्या मंदिरातील चप्पल चोर आहेत!

यावेळी आमदार तांबे म्हणाले, केंद्रात व राज्यात जे सरकार सत्तेत आहे, त्यांचा स्वतःच्या कामगिरीवर विश्वास नाही. त्यांनी आत्मविश्वास केव्हाच गमावला आहे. त्यामुळे सातत्याने मतदारांचे धार्मिक धृविकरण, वाद- विवाद व तिरस्कार पसरवण्याचे काम ते करत आहेत. त्यासाठी पडद्यामागून असंख्या यंत्रणा काम करीत आहेत. भारतीय राज्यघटनेला हे अपेक्षित नाही. त्यामुळे काँग्रेसचा मुळ धर्म व भूमिका सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा आहे. त्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. त्याची सरकारला प्रचंड धास्ती वाटते आहे.

डॉ. तुषार शेवाळे यांनी येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तालुकास्तरापासून संघटना जोमाने कामाला लागली आहे. तालुक्यातील भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये बूथ, ब्लॉक, तालुका व जिल्हास्तरावर ‘हात से हात जोडो’ अभियान येत्या २५ जानेवारी पासून सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, दिगंबर गिते, अॅड. संदीप गुळवे, रमेश कहाडोळे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, प्रा. अनिल पाटील, रतन जाधव, अनुसूचित जाती अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, यशवंत अहिरे, गुणवंत होळकर, पांडुरंग शिंदे, निवृत्ती डावरे व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाश पिंगळ (दिंडोरी), गणपत चौधरी (पेठ), दिनकर निकम (देवळा), हरेश्वर सुर्वे (नांदगाव), विनायक सांगळे (सिन्नर), मधुकर शेलार (निफाड), संपतराव सकाळे (त्र्यंबकेश्वर) डॉ. राजेंद्र ठाकरे (मालेगाव), रमेश जाधव (इगतपुरी), संजय जाधव (चांदवड), अॅड. समीर देशमुख (येवला) आदी तालुकाध्यक्ष तसेच मविप्रच्या संचालकपदी निवड झाल्याने अॅड संदीप गुळवे, मजूर फेडरेशन संचालकपदी निवड झाल्याबद्दल संपतराव सकाळे, शिवाजी कासव यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी किशोर कदम, बाळासाहेब कुकडे, विठोबा भोये, पंडित गायकवाड, सुनीता पालवे, भास्कर पालवे, मुजाहिद खतीब, अश्पाक शेख, स्वप्निल सावंत, चंदूशेठ किरवे, भिका चौधरी, प्रा.प्रकाश खळे, धर्मराज जोपळे, उत्तम भोसले, उत्तम ठोबंरे, नितीन बच्छाव, प्रवीण लोखंडे, निवृत्ती महाले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com