Shivsena; शिंदे यांनी दाढीवर हात फिरवला तरी राऊत आडवे होतील!

खासदार संजय राऊत यांच्याबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली
Sanjay Raut & Gulabrao Patil
Sanjay Raut & Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : (Jalgaon) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde) नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) काल शिवसेना (Shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविषयी बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करीत टिका केल्याने त्यांची जीभ घसरली. (Gulabrao Patil says If Eknath Shinde Even think Sanjay Raut will defeat)

Sanjay Raut & Gulabrao Patil
Nashik News; देवीदास पिंगळेंनी उधळला भाजप नेत्यांचा डाव!

जळगाव येथे हिंदू जनसंघर्ष समितीतर्फे आयोजित आक्रोश मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय राऊत यांच्याविषयी मंत्री पाटील यांना विचारले असता त्यांनी खासदार राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने फारसे गंभीर नेते नाहीत, असे सांगितले.

Sanjay Raut & Gulabrao Patil
Sanjay Raut; `ते` तर शिवसेनेच्या मंदिरातील चप्पल चोर आहेत!

श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरविला असता तर संजय राऊत खासदारकीच्या निवडणुकीत आडवा झाला असता अशा एकेरी शब्दात मंत्री पाटील यांनी टीका केली.

श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत टीका करीत आहेत, मात्र त्यांना आमचे एकच आव्हान आहे, जर राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरविला असता, तर संजय राऊत खासदार झाला नसता, आडवा पडला असता. आज खासदारही राहिला नसता. त्यामुळे त्यांनी उगाच टीका करू नये.

‘पालकमंत्री या नात्याने हिंदू जनजागृती समितीतर्फे मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी आलो आहे. अनेक पक्षांचे पदाधिकारी हिंदू ऐक्यासाठी एकत्र आले आहेत. जे मुस्लिम समाजबांधव आमच्यासोबत असतील, त्यांना आमचे सांगणे आहे. ‘इस देशमें रहेना होंगा तो वंदेमातरम’ करना होगा’. आम्ही कोणत्या धर्माविषयी बोलत नाही. मात्र, आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर आम्ही गांधीजी नाहीत, या गालात मारली तर दुसरा गाल पुढे करणार. आम्ही जशास तसे उत्तर देऊ हे लक्षात ठेवावे. जनतेच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो आहे. तीन पक्षाचे सरकार असते तर मी या व्यासपीठावर येऊच शकलो नसतो.

त्यावेळी या बाजूला कॉंग्रेस असती आणि एका बाजूला राष्ट्रवादी राहिली असती. आज एका बाजूला भाजप आहे, दुसऱ्या बाजूला सनातन आहे. हिंदू एकजुटीचे मी आभार मानतो. आमच्यावर मोठी टीका झाली. हिंदू समितीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे तिकडे बसले आहेत. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, अशी ग्वाही देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com