‘राष्ट्रवादी’तर्फे महागाई विरोधात केंद्र सरकारची अंत्ययात्रा काढली

महागाई विरोधात प्रेतयात्रा काढण्यात आली. त्यात गुलाबराव देवकर, रवींद्र पाटील, मनीष जैन सहभागी झाले.
Eknath Khadse & NCP leader in agitation
Eknath Khadse & NCP leader in agitationSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : देशात दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत असून त्याला केंद्र सरकार (Centre Government) जबाबदार आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (NCP) तीव्र आंदोलन करण्यात आले. चारचाकी गाडी दोराने ओढण्यात आली. मोदी सरकारची तिरडी काढण्यात आली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक जागरण गोंधळ घालण्यात आला. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, (Supriya Sule) एकनाथ खडसे, (Eknath Khadse) गुलाबराव देवकर (Gulabrao Patil) आदींचा सहभाग होता. (Centre is responsible for inflation in country)

Eknath Khadse & NCP leader in agitation
ओरडून बोलले म्हणजे पटते हा भ्रम नेत्यांनी सोडावा!

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयापासून महागाई विरोधात तिरडी काढण्यात आली. तिरडीवर प्रतिकात्मक गॅस ठेवून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत प्रेतयात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रेतयात्रेचे दहन करण्यात आले.

Eknath Khadse & NCP leader in agitation
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे निधीसाठी सुप्रिया सुळेंना साकडे

चारचाकी गाडी ओढत आणली

देशातील पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला, यावेळी चारचाकी गाडी दोराने बांधून ती ओढत राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांचा यावेळी सहभाग होता.

जागरण गोंधळ

महागाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करण्यात आला. यात खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री अरूणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com