राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे निधीसाठी सुप्रिया सुळेंना साकडे

धुळे महापालिकेतील नगरसेवकांनी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे निधीसाठी सुप्रिया सुळेंना साकडे

धुळे : महापालिकेत (Dhule) भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेत आहे. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. अनेक अडचणी येत असल्याने प्रभागातील विकासकामे होत नाही. नागरिकांची ओरड असल्याने प्रभागातील कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) येथील नगरसेवकांनी पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडे केली. (NCP`s Corporators deemand funds for City devolopment)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे निधीसाठी सुप्रिया सुळेंना साकडे
ओरडून बोलले म्हणजे पटते हा भ्रम नेत्यांनी सोडावा!

खासदार सुप्रिया सुळे गेल्या तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी धुळे येथील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, कार्यकर्ते, नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक नागिरकांचे प्रश्न, विकासकामे याबाबत देखील चर्चा झाली. यावेळी काही नगरसेवकांनी त्यांना निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे निधीसाठी सुप्रिया सुळेंना साकडे
गद्दारी महागात पडणार; काँग्रेसची साथ देणाऱ्या पाच सदस्यांना भाजपने पकडले खिंडीत

धुळे महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताने भाजपने सत्ता काबीज केली. सद्यःस्थितीत धुळे महानगरपालिकेत निधीची कमतरता आहे. त्यामुळे प्रभागाचा विकास करणे अत्यंत कठीण आहे. आम्ही विरोधी पक्षात असल्याने आमच्या परीने प्रभागात जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा, क्षमतेनुसार प्रभागातील विकास कामांबाबत आग्रही भूमिका घेऊन व प्रामाणिकपणे कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

प्रभागात बहुसंख्य ठिकाणी नवीन वसाहत होऊनदेखील तेथे विकास कामे नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी खासदार श्रीमती सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांच्यासह नगरसेवक वसीम बारी, मुक्तार मन्सूरी, वसीम मंत्री आदींनी मागणीचे निवेदन दिले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com