Sharad Pawar Vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना पवारांवरील टीका भोवणार; येवल्यातच काळे झेंडे दाखवून आंदोलन

Yewala NCP Activist : येवला फक्त शरद पवारांचा बालेकिल्ला, कार्यकर्त्यांच्या घोषणा
Yewala NCP Activist
Yewala NCP ActivistSakarnama

Nashik Political News : बीडमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभांनंतर राज्याचे वातावरण गरम झाले आहे. पवारांना उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर टीका केली. यावर सभेतच गोंधळ झाल्याने त्यांना भाषण आवरते घ्यावे लागले असले तरी याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. शरद पवारांवर टीका केल्याने भुजबळांचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. यातच आता त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या येवल्यातूनही भुजबळांविरोधात लोकांनी आंदोलन केले. यामुळे पवारांवरील टीका भुजबळांना भोवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Latest Political News)

पक्षातील बंडखोरीनंतर शरद पवारांनी फुटीरांविरोधात लोकांत जाऊन आपला पक्ष वाढवण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी येवला, कोल्हापूर आणि बीड येथे सभा घेतल्या. या सभांना अजित पवारांनीही उत्तर देणार असल्याचे आव्हान केले होते. यातूनच बीड येथे अजितदादांची सभा झाली.

यावेळी छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) तेलगी प्रकरणासंह इतर काही मुद्यांसह पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी लोकांनी गोंधळ घातल्याने त्यांनी आपले भाषण आवरते घेतले. यानंतर भुजबळांचा आमदार रोहित पवार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. आता येवल्यातूनही भुजबळांचा निषेध करण्यात येत आहे. येवला हा शरद पवारांचाच बालेकिल्ला असल्याचे यावेळी कार्यकर्तांनी ठासून सांगितले.

Yewala NCP Activist
Radhakrishna Vikhe Patil : कर्जत-जामखेडमधील 'त्या' टँकर्सवरून विखे पाटलांचा पाराच चढला; तहसीलदारांना सुनावले !

'एका बाजूला Sharad Pawar शरद पवारांना विठ्ठल म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने दुखवायचे... हे दुर्दैवी आहे. येवला हा कुणाचा बालेकिल्ला नसून पवारांचाच बालेकिल्ला आहे. हे अनेकदा दिसले व पुन्हा दिसेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी लोकांनी भुजबळांविरुद्ध काळे झेंडे व काळ्याफिती लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

येवल्यातील शरद पवार गटाचे नेते माणिकराव शिंदे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शाहू शिंदेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवारांचा जयघोष करत दुचाकी रॅली काढण्यात आली. हे सर्व कार्यकर्ते तहसील कार्यालयावर जमा झाले. तेथेही घोषणाबाजी करून कार्यकर्तांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले.

Yewala NCP Activist
Ambadas Danve Letter To CM News : टोल वसुलीत `झोल`, श्वेतपत्रिका काढा ; दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

यावेळी शिंदे म्हणाले की, "शरद पवाराविरोधात सातत्याने बोलले जात आहे. मात्र बीडमधील वक्तव्य महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही. भरसभेत झालेला विरोध हे पवारांवरील प्रेम आहे. ज्यांना पवारांनी वारंवार मंत्रिपदे दिली, त्यांचे विरोधात बोलणे अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे विठ्ठल विठ्ठल म्हणून बोलायचे आणि दुसरीकडे दुखवायचे हे हे बरोबर नाही. हा प्रकार निषेधार्थच आहे."

भुजबळांना इशारा देताना शिंदेंनी, "शरद पवारांमुळे भुजबळांना येवल्यातील लोकांनी राजकीय पुनर्जन्म दिला आहे, हे विसरून चालणार नाही. आज अवघ्या दोन तासात जमलेली ही गर्दी म्हणजे मतदारसंघ केवळ आणि केवळ पवारांचाच आहे, हे विसरू नये," असे सांगितले. दरम्यान, मतदारसंघातून मंगळवारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबई येथे शरद पवारांच्या भेटीसाठी जाणार असल्याचीही शिंदेंनी माहिती दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com