Malegaon News: मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांवर भ्रष्टाचार, गैरव्यवहार, कमिशनखोरीचे आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ५) महापालिकेच्या आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस(NCP) चे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी महापालिका आयुक्तांवर ठेकेदारांचे धनादेश देण्यासाठी व विविध विकास कामांसाठी बजेट देताना अंदाजपत्रकीय तरतूद करण्यासाठी दहा टक्के घेत गंभीर आरोप केला आहे. आयुक्त अधिकाऱ्यांच्या पाठीशी कोणाचाही आशीर्वाद असो पण महानगरपालिका, शहर व कर आमचा आहे. महापालिकेतील पैशांची उधळपट्टी व भ्रष्टाचार(Corruption) सहन करणार नाही असा इशारा शेख यांनी यावेळी दिला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी दादागिरी नही चलेगी, चोरी चमारी नही चलेंगी, कमिशनखोरी नही चलेगी यांसह विविध घोषणाबाजी केली.
मालेगाव(Malegaon)शहरासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शहर मलनिस्सारण टप्पा-२ भुयारी गटार योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेने निविदा दाखल करण्यासाठी तयार केलेल्या अटी, शर्ती आक्षेपार्ह आहेत. ही बाब लक्षात घेता आयुक्त, जीवन प्राधीकरण व मनपा अभियंत्यांनी संगनमताने या योजनेचा ठेका हित संबंधातील व्यक्तीस मिळावा यासाठी निकृष्ट दर्जाच्या अटी शर्ती घातल्या.
महिला बचत गटाच्या पोषण आहार ठेक्यासाठी पाच मनपा अधिकाऱ्यांवर पाच लाख रुपयांची मागणी केली. मुकुंदवाडीतील अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ केली. दुरध्वनी करुनही कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत असे विविध आरोप करत जोरदार टीका केली.
शेख यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोरील नामफलकाला काळे फासले. आंदोलनात माजी सभागृहनेते अस्लम अन्सारी, माजी नगरसेवक शकील बेग, रफीक शेख, शेख रफीक बशारत, मुजफ्फर काजी, निसार शेख आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.