Ajit Pawar Politics : अजित पवार उद्विग्न; तीन मंत्री, उपयोग काय? झिरवळ अन् कोकाटेंना सुनावलं!

Ajit Pawar Upset with Ministers Zirwal & Kokate: नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन मंत्री असं नाही पक्षाचा अस्तित्वासाठी झगडा!
ajit pawar political updates
ajit pawar political updatesSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Latest Political News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ते आमदार आणि काही मंत्र्यांच्या निराशा जनक कामगिरीबाबत उजवीकडे झाले. त्यामुळे मुंबईतील ही बैठक चर्चेचा विषय बनली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत झाली. यावेळी आगामी निवडणुका आणि महायुती यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांबाबत आपली खदखद व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा धागा पकडून काही मंत्र्यांची झाडाझडती घेतली. विशेषत: नाशिकला तीन मंत्री आहेत. मात्र पक्ष वाढीसाठी त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही.

नाशिक (Nashik) जिल्ह्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने ते या बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ उपस्थित होते.

ajit pawar political updates
Sujay Vikhe vs Balasaheb Thorat : 'स्वाभिमानाच्या गप्पा मारतात, त्यांना खासगीत विचारा..'; विखे यांचा थोरातांना टोला

बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी विशेष करून क्रीडामंत्री कोकाटे यांच्यावर कटाक्ष टाकत पक्षासाठी काय काम केलं? संघटनात्मक वाढीसाठी कोणते उपक्रम राबवले? कार्यकर्ते आणि मंत्री यांच्यात समन्वय निर्माण झाला का? अशी नाराजी सर्वच मंत्र्यांबाबत व्यक्त केली.

ajit pawar political updates
Child Abuse Case : संतापजनक! शिक्षकाकडून 13 वर्षांपासून लैंगिक शोषण

नाशिकला तीन मंत्री आहेत. पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी त्याचा उपयोग झालेला नाही अशी खंत व्यक्त केली. त्यांचा हा टोमणा प्रामुख्याने क्रीडा मंत्री कोकाटे आणि मंत्री झिरवळ यांच्याबाबत होता. आता किमान निवडणुकीत तरी काम करा, असे पवार उद्विग्न होत म्हणाले.

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हिंगोलीचे पालकमंत्री आहेत. हे मंत्री आपल्या जिल्ह्यात फिरकतच नाही अशी तक्रार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे तुमचा पक्षाला उपयोग काय? या शब्दात पवार यांनी सासू बोले सुने लागे हा प्रत्यय दिला.

खुद्द उपमुख्यमंत्री पवार यांनीच मंत्री आणि नेत्यांची खरडपट्टी केली. त्याचा योग्य संदेश घेऊन हे सगळे सक्रिय होतील अशी अपेक्षा आहे. किमान जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुकांसाठी मंत्र्यांनी कंबर असावी अशी अपेक्षा असल्याचे, एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com