Dhanraj Mahale : धनराज महालेंचे झिरवाळांना आव्हान, तुमचा पराभव मीच करणार!

Dhanraj Mahale Challenges Narhari Zirwal in Assembly Elections: शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी झिरवाळ यांना सुनावले.
Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Dhanraj Mahale & Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Zirwal Vs Mahale: दिंडोरी विधानसभा मतदार संघात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महायुतीचे उमेदवारी असतील. गेले काही दिवस श्री झिरवाळ विविध राजकीय अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

आमदार झिरवाळ सध्या महायुतीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्याने ते महायुतीचे उमेदवार असतील. मात्र त्यांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले आहे. झिरवाळ शरद पवार गटात की अजित पवार गटात याचीही चर्चा सुरू असल्याने दिंडोरी मतदार संघात सध्या गोंधळाचे वातावरण आहे.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Balasaheb Thorat Politics: थोरात यांचे संजय गायकवाड यांना खडे बोल... "ही तर नथुराम प्रवृत्ति"

आमदार झीरवळ यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले हे जोरदार तयारी करीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीचा घटक असलेल्या हिरव्या यांना घरातूनच आव्हान मिळाले आहे. यामध्ये महाले हे झिरवाळ यांच्या मार्गातील प्रमुख अडथळा आहेत.

यासंदर्भात श्री झिरवाळ यांनी माजी आमदार महाले हे प्रबळ दावेदार नाहीत. ते पराभूत होण्यासाठी उमेदवारी करीत आहेत. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे. माजी आमदार महाले यांनी उमेदवारी करू नये, असे आपले मत आहे असे म्हटले होते.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Radhakrishna Vikhe And Sujay Vikhe : 'फिक्स झालं'?, राधाकृष्ण विखेंचा 'सपोर्ट'; थोरातांना सुजय विखे आव्हान देणार

आमदार नरहरी झिरवाळ यांच्या विधानाला माजी आमदार महाले यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. यानिमित्ताने माजी आमदार महाले यांनी हिरवळ यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. आमदार झिरवाळ गैरसमजात आहेत. त्यांनी जमिनीवर यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

श्री महाले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने दिंडोरी मतदार संघात मी यंदा उमेदवारी करणार आहे. कोणत्याही स्थितीत मी निवडणुकीला सामोरे जाईल. प्रसंगी अपक्ष उमेदवारी करण्याची देखील माझी तयारी आहे. आमदार झिरवाळ यांनी गैरसमजात जगू नये, असे माझे त्यांना सांगणे आहे.

श्री महाले यांनी झिरवाळ यांचे सगळेच काढले. ते म्हणाले, गेली दहा वर्ष झिरवळ आमदार आहेत. गोड बोलण्या पलीकडे त्यांना काहीही करता आले नाही. दहा वर्षात केलेले एकही ठोस काम त्यांना सांगता येणार नाही.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Eknath Shinde Politics: शिवसेना शिंदे गटाला दणका, चांदवड मतदार संघात नेत्यांचे सामूहिक राजीनामे!

जनतेला फार काळ वेड्यात काढता येणार नाही. प्रचंड मोठा निधी आणण्याचा दावा ते करतात. हा निधी गेला कुठे? कोणती ठोस आणि मोठी कामे झाली आहेत. हे झिरवाळ सांगू शकतील का? कारण आम्हाला त्यांनी केलेली ठोस आणि लोकोपयोगी कामे दिसत नाहीत. हा सामान्यांचा प्रश्न आहे.

सर्व रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. जनतेचे एकही काम समाधानकारक झाले, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. श्री झिरवाळ यांनी हवेत राहू नये. प्रत्यक्ष जमिनीवर येऊन माहिती घेतल्यास मतदारसंघातील जनता त्यांना वास्तवाची जाणीव करून देईल.

मी गेली अनेक महिने निवडणुकीची तयारी करीत आहे. जनतेचा कानोसा घेत आहे. खूप श्रीमंती आली म्हणून निवडणूक जिंकता येते, या भ्रमात आमदार झिरवाळ यांनी राहू नये. अशी कानउघडनी देखील महाले यांनी केली आहे.

दिंडोरी विधानसभा मतदारसंघात आमदार झिरवाळ निवडणुकीची तयारी करीत आहेत. मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात हा अनेकांचा संभ्रम आहे. स्वतः झिरवाळ याबाबत सातत्याने गोंधळ होईल, असे संकेत देतात. आता महायुतीतच त्यांना प्रबळ विरोधक तयार झाला आहे. या स्थितीत दिंडोरीच्या आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलाच राजकीय संघर्ष पाहायला मिळेल, हे मात्र नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com