Ajit Pawar: Video अजितदादांच्या सुरक्षेत वाढ; मालेगावात माजी आमदाराच्या घरासमोर तगडा पोलिस बंदोबस्त

Ajit Pawar Visiting Malegaon Jansanman Yatra: धुळे, मालेगावमधील काही संघटनांकडून धोकादायक हालचाली सुरू आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या दौऱ्यात सुरक्षेबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्या आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे. आज ते मालेगाव, जळगाव, धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या मालेगाव, धुळे दौऱ्यावेळी धोकादायक हालचाली होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेण्याच्या सूचना राज्य गुप्त वार्ता विभागाने काल (रविवारी) दिल्या आहेत. त्यानंतर अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अजितदादांच्या दौऱ्यात (Jansanman Yatra) पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. दौऱ्यातील प्रत्येक घटनेवर पोलिस लक्ष ठेवून आहेत.

धुळे, मालेगावमधील काही संघटनांकडून धोकादायक हालचाली सुरू आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या दौऱ्यात सुरक्षेबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्या आहेत. अल्पसंख्याक समाज लोकसभा निवडणुकीत महायुती पासून दूर गेल्यानं त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न अजित पवार आजच्या दौऱ्यात करणार आहेत.

अजित पवार हे मालेगावला निघाले आहेत. मालेगावात ते माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेणार आहेत. आसिफ शेख मालेगाव मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आसिफ शेख यांच्या उमेदवारीसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतचा आढावा अजितदादा घेणार आहेत.

माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर अजित पवार हे आज त्यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीला ( शरद पवार गट ) सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्या भेटीला महत्व आलं आहे. आसिफ शेख यांच्या भेटीनंतर अजित पवार हे धुळे अमळनेरच्या दौऱ्यावर आहेत.

आसिफ शेख यांच्या घरी अजित पवार येणार असल्याने याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांची पाहणी करुन चेकिंग करुन पोलिसांनी खात्री देखील केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com