Ajit Pawar Politics: अजित पवारांनी सोपवली आमदार हिरामण खोसकर यांच्यावर खास जबाबदारी!

NCP Ajit Pawar: MLA Hiraman Khoskar appointed as State head of NCP Trible wing -आमदार हिरामण खोसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आदिवासी आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Hiraman Khoskar
Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

Hiraman Khoskar News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने आदिवासी मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात आदिवासी क्षेत्रात प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे पक्षाकडून आगामी काळात राज्यातील आदिवासी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विविध नव्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये नाशिकचे आमदार हिरामण खोसकर यांची आदिवासी आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मुंबईत झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात खासदार तटकरे यांच्या हस्ते आमदार हिरामण खोसकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने आता आदिवासी क्षेत्रात लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी आमदार खोसकर यांची नियुक्ती करण्यात आली. लवकरच आमदार खोसकर राज्यात आदिवासी भागांचा दौरा करून नव्याने युक्त्या करणार आहे.

Hiraman Khoskar
Narhari Zirwal Politics: गुरु श्रीराम शेटे जिल्हा परिषदेसाठी कोणाची बाजू घेणार? मंत्री झिरवाळ की खासदार भगरे यांची?

आमदार खोसकर हे आदिवासी आमदार असून त्यांनी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेसह विविध संस्थांवर प्रतिनिधित्व केले आहे. नाशिक जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आदिवासी राखीव आहेत. यातील तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आहेत.

नाशिक विभागात धुळे नंदुरबार आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकप्रतिनिधींचे प्राबल्य आहे. आदिवासींची संबंधीत विविध संस्था आणि शासकीय कार्यालय नाशिक येथे आहेत. नाशिक हे गेल्या काही दिवसात राज्यातील आदिवासींचे आंदोलनाचे केंद्र बनले आहे. पार्श्वभूमीवर आमदार खोसकर यांच्या नियुक्तीला महत्त्व दिले जात आहे.

महायुती सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हा एक प्रमुख पक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने आदिवासी लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. राज्यातील आदिवासींचे प्रश्न समजून घेऊन पक्षाचा विस्तार करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. पक्ष आणि नेत्यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविन, असे आमदार खोसकर यांनी सांगितले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com