येवला : येवला (Yeola) तालुक्यातील गवंडगाव, चिचोंडी बु. सुरेगाव व चिचोंडी खु. या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) सरशी झाली. चार पैकी तीन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेने (Shivsena) सत्ता मिळविली आहे. (Three Grampanchayat elections win by NCP)
या सर्व निवडुन आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत केले. नवनिर्वाचीत सदस्यांचे अभिनंदन केले.
यावेळी श्री. भुजबळ यांनी ग्रामपंचायतीत एकजुटीने काम करत गावाचा विकास साधावा असे आवाहन केले.
येवला तालुक्यातील गवंडगाव, चिचोंडी बु. सुरेगाव व चिचोंडी खु. या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ४० पैकी २४ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, ११ उमेदवार शिवसेनेचे तर भाजपचे चार व एक अपक्ष उमेदवार निवडून आले आहे. या चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सरशी झाली आहे तर एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या सत्ता आली आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, राधाकिसन सोनवणे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर शेवाळे,सचिन कळमकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.