NCP News: 85 वर्षांच्या केसलीबाईंची भादल ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता

धडगाव (नंदुरबार) तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
D Y Sarpanch of NCP
D Y Sarpanch of NCPSarkarnama

नंदुरबार : (Nandurbar) भादल ग्रामपंचायतीच्या (Grampnachayat) उपसरपंचपदी ८५ वर्षांच्या केसलीबाई पावरा (Keslibai Pawra) यांची बिनविरोध निवड करून ग्रामस्थांनी आदर्श निर्माण करण्यात आला आहे. या सहा ग्रामपंचायतींवर पूर्णपणे वर्चस्वाचा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) फडकविण्यात यश आले आहे. (NCP`s six Sarpanch elected in Grampanchayat elections)

D Y Sarpanch of NCP
ZP Corruption News; चोरीला गेलेला रस्त्यासाठी अभियंत्यांची पायपीट

धडगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्वाचा झेंडा फडकविला आहे. सर्व नवनिर्वाचीत सरपंचांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला.

D Y Sarpanch of NCP
Graduate constituency; काँग्रेसने नागपूरच्या निवडणुकीतून पळ का काढला?

खडकीच्या उपसरपंचपदी अनिता नाईक, झापीच्या उपसरपंचपदी आतल्या गुमदा नाईक, भादलच्या उपसरपंचपदी केसलीबाई पावरा, सिंदीदिगरच्या उपसरपंचपदी जागल्या नाईक, भाबरीच्या उपसरपंचपदी तेरशा पावरा, उडद्याच्या उपसरपंचपदी ठुमल्या पावरा यांची बिनविरोध निवड झाली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सीताराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झाली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून तोरणमाळ भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढल्याचे सिद्ध झाले आहे.

धडगाव (अक्राणी) तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणकुा नुकत्याच झाल्या. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहा ग्रामपंचायतींवर अधिकृतरीत्या वर्चस्वाचा झेंडा फडकविला आहे. लोकनियुक्त सरपंचदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आहेत. या सहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडीतदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसरपंच बिनविरोध झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. राऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सीताराम नुरला पावरा यांच्या नेतृत्वाखाली धडगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.

नवनियुक्त लोकनियुक्त सरपंच व बिनविरोध निवडून आलेल्या उपसरपंचांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. राऊ मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सीताराम पावरा, झापीच्या सरपंच गीता पावरा, भादलचे सरपंच बुरका पावरा, सिंदीदिगरच्या सरपंच सोमाबाई पावरा, भाबरीचे सरपंच सायमल पावरा, उडद्याच्या सरपंच लावीबाई पावरा आदींनी कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com