Chhagan Bhujbal : उशिरा मंत्रिपद, सरकारी बंगलाही नाही, ध्वजारोहणाचा मान नाही… भुजबळांवर अन्यायच अन्याय?

Chhagan Bhujbal Nashik politics : छगन भुजबळांना सुरुवातीला मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं, त्यांच्याऐवजी कट्टर विरोधक माणिकराव कोकाटेंना बळ दिलं गेलं. नंतर मंत्रिपद दिल्यावर आजूनही सरकारी बंगला त्यांना देण्यात आलेला नाही.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalsarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वातंत्रदिनी गोंदिया जिल्ह्यात जाऊन ध्वजारोहण करण्यास नकार दिला आहे. भुजबळांनी त्यासाठी तब्येतीचे कारण पुढे केले असले तरी प्रत्यक्षात त्यामागचे खरे कारण म्हणजे स्वातंत्र्य दिनी नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत असं सांगितलं जात आहे. त्यामुळे जेष्ठ नेते छगन भुजबळांची पुन्हा एकदा अवहेलना झाल्याचा मुद्दा पुढे आला आहे, राजकीय वर्तुळात त्यावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

भुजबळांची राज्य सरकारकडून हवहेलना होत असून त्यांनी ती सहन करु नये असा सल्ला कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांना दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील असं म्हटलं आहे की, छगन भुजबळ हे जेष्ठ असल्याने त्यांचे वय, अनुभव पाहाता त्यांना नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान मिळायला हवा होता. नाशिकमध्येही तीच चर्चा आहे, छगन भुजबळांसारखा जेष्ठ मंत्री जिल्ह्यात असताना बाहेरच्या जिल्ह्याचा मंत्री इथे येऊन ध्वजारोहण करणार ही बाब न पटणारी आहे.

भुजबळांसोबत अगदी सुरुवातीपासूनच जाणीवपूर्वक या गोष्टी सुरु आहेत का अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. कारण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आधी भुजबळांना डावलण्यात आलं होतं. त्यांच्याऐवजी भुजबळांचे कट्टर विरोधक असलेल्या माणिकराव कोकाटे यांना संधी दिली. त्यातून एकप्रकारे भुजबळांना डिवचण्यात आलं होतं. भुजबळांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली तरी त्याची कोणतीही दखल पक्षश्रेष्ठींकडून घेतली गेली नाही. खूप संघर्ष केल्यानंतर तेव्हा कुठे भुजबळांना फार उशीराने मंत्रिपद मिळालं.

Chhagan Bhujbal
BJP Politics : पक्षाचं उघडलं दार पण कार्यकारिणीचं बंदच ठेवलं, बडगुजरांना भाजपने थोडं दूरच ठेवलं..काय कारण?

धनंजय मुंडे यांच्या जागी मंत्री झालेल्या भुजबळांचा संघर्ष आजूनही संपलेला नाही. त्यांना आजूनही सरकारी बंगला मिळालेला नाही. राज्याच्या सामन्य प्रशासन विभागाने त्वरित हालचाली करुन भुजबळांना सरकारी बंगला मिळवून देणं अपेक्षित होतं. मात्र मंत्री झालेले भुजबळ अजूनही सरकारी बंगल्याच्या प्रतीक्षेतच आहे.

Chhagan Bhujbal
Nashik Guardian Minister : कोण म्हणतं काहीच फरक पडत नाही? पालकमंत्री नसल्यानं नाशिकचं होतय नुकसानच नुकसान

मंत्रिमंडळ व जिल्ह्यातील जेष्ठ सदस्य म्हणून 15 ऑगस्ट ला त्यांना नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान मिळायला पाहीजे होता. पण, तिथेही ध्वजारोहणासाठीची जी यादी जाहीर झाली, त्यात गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याची शस्रक्रिया झाल्याने रिप्लेसमेंट म्हणून भुजबळांना त्याठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी जा म्हणून सांगितलं. पण नाशिकमध्ये संधी न देता बाहेरच्या जिल्ह्यात पाठवत असल्याने नाराज होऊन भुजबळांनी गोंदियाला जाण्यास साफ नकार दिला. आता मंत्री मंगलप्रभात लोढा हे गोंदियात ध्वजारोहण करणार आहेत. मात्र या सगळ्यात कुठे तरी भुजबळांची खरंच वारंवार अवहेलना होतीय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com