Shocking News: `राष्ट्रवादी`च्या शहराध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा दाखल!

Ranjeetraje Bhosale: धुळे शहरातील कचराप्रकरणी राड्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
Ranjeetraje Deshmukh
Ranjeetraje DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Dhule News: शहरातील कचरा संकलन आणि एक लाख रुपयांची मागणी केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व कचरा संकलन ठेकेदार स्वयंभू कंपनीत वादाची ठिणगी पडली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात खंडणीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले आहे. (NCP versus Garbage contractor dispute take serious mode in Dhule)

या प्रकरणी कंपनी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत राष्ट्रवादीच्या दोषी पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत स्वच्छतेचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्धार केला, तर ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी स्वयंभू कंपनीवर आरोपाचा पलटवार केला.

Ranjeetraje Deshmukh
APMC Politics: शिंदेंची शिवसेना बाजार समितीच्या रिंगणात?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शहराध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी सांगितले, की शहरात कचरा संकलन होत नसल्याने आंदोलन केले. ते जिव्हारी लागल्याने स्वयंभू कंपनीचा प्रकल्प व्यवस्थापक फडतरे हा धुळेकरांवर घसरला. त्यामुळे त्याचा पक्षाच्या आक्रमक आंदोलकांनी समाचार घेतला. असे असताना फडतरे याने शहर पोलिस ठाण्यात एक लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.

धुळ्यात काय सुरू आहे? जनतेसाठी आंदोलन करताना दरोडा, खंडणी, चोरीसारखा गुन्हा दाखल केला जातो. सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीमुळे असे गुन्हे दाखल केले जात आहेत. ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असा हा निंदनीय प्रकार आहे. जनतेने न्याय्य हक्कासाठी लढायचे नाही का? कितीही गुन्हे दाखल केले तरी राष्ट्रवादी जनतेसाठी लढा सुरूच ठेवेल.

Ranjeetraje Deshmukh
Uday Samant News: `पांजरपोळ`च्या जागे संदर्भात अहवाल सादर करा

शहरात घंटागाडी वेळेवर येत नाही. कचरा संकलन होत नाही. महापालिकेने स्वयंभू कंपनीला सात वर्षांसाठी ५९ कोटींचा ठेका दिला आहे. तरीही शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने संविधानिक पद्धतीने आंदोलन केले; परंतु ठेकेदार कंपनीचा व्यवस्थापक फडतरे याने धुळेकरांविषयी चुकीचे शब्द वापरले.

‘धुळेकर जनता घाण करते, धुळेकरांना वळण नाही, दारू पिऊन बाटल्या फेकतात,’ अशा पद्धतीचे वक्तव्य त्याने केल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. फडतरे याचा शाई व अंडे फेकून निषेध व्यक्त केला. मात्र, दादागिरी, हुकूमशाही पद्धतीने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भोसले व सहकाऱ्यांवर दरोडा, खंडणी, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हा अशोभनीय व लाजिरवाणा, निषेधार्ह प्रकार आहे. काही राजकीय मंडळी आणि पोलिस प्रशासनाने संगनमताने गुन्हा दाखल केला आहे; परंतु अशा दबावाला राष्ट्रवादी घाबरत नाही. जो धुळेकरांचा अवमान करेल, शहराच्या बदनामीचा प्रयत्न करेल त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com