Uday Samant News: `पांजरपोळ`च्या जागे संदर्भात अहवाल सादर करा

मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीत उद्योजक आणि आमदार देवयानी फरांदे उपस्थित होत्या.
Minister Uday Samant
Minister Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: शहराला लागून अतिरिक्त एमआयडीसीसाठी (Indusrty) पांजरपोळची जागा संपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त (NMC) त्यांची ही सदस्य समिती नियुक्त करून १५ दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मंगळवारी दिले. (State Government will take initiative for Nashik MIDC expansion)

चुंचाळे शिवारात पांजरापोळ संस्थेची ३२७ हेक्टर जमीन आहे. अंबड औद्योगिक वसाहतीला लागून सदरची जमीन असल्याने औद्योगिक वसाहतीसाठी ती जमीन आरक्षित करावे, अशी मागणी आहे.

Minister Uday Samant
Abdul Sattar News: अब्दुल सत्तार यांच्यापुढे तरुण म्हणाले, `पन्नास खोके, एकदम ओके`

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी यासाठी पुढाकार घेतला. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज तातडीने विधान भवन परिसरात बैठक बोलविण्यात आली. बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गवळी, प्रदीप पेशकार, नियमाचे धनंजय बेळे, आयमाचे राजेंद्र अहिरे, आशिष नहार आधी पदाधिकारी उपस्थित होते.

पांजरपोळ ही सामाजिक संस्था आहे. गो- पालनांसाठी सदरची जागा त्यांनी घेतली आहे. सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. जागा संपादित करण्यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक झाली.

Minister Uday Samant
Sanjay Raut; शिंदे गटाला हादरा, मंत्री दादा भुसेंवर 157 कोटींच्या लुटीचा आरोप?

पांजरपोळ संस्थेच्या ताब्यात असलेल्या या जागेत वृक्षसंपदा किती?, सदर जागेवर किती गाईंचे पालन पोषण होते? या संदर्भातील सविस्तर अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचना उद्योग मंत्री सामंत यांनी दिल्या. त्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती आमदार फरांदे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com