भाजप समर्थक बंडखोरांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अडचणीत?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण पाटील भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत.
Jalgaon Bank
Jalgaon BankSarkarnama

रावेर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी रावेरमधून सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुण पाटील (Congress leader Arun Patil) यांनी भारतीय जनता पक्षाचे समर्थन घेतले. काँग्रेसचे व जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील (Ex Vice president of Jalgaon DCC bank Rajiv Patil) यांनीही उमेदवारीचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीच्या जनाबाई गोंडू महाजन (Janabai Mahajan) यांची मार्ग खडतर झाला आहे.

Jalgaon Bank
हाय व्होल्टेज ड्रामा; माजी आमदार म्हणतात, `ये मालेगाव है, लोकशाही चलेगी, नोकरशाही नही`

सोमवारी रावेर सोसायटी मतदारसंघात कैलास सरोदे, नंदकिशोर महाजन, मंदाकिनी राजेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर इतर संस्था मतदारसंघातून ज्ञानेश्वर महाजन, प्रकाश पाटील, महिला राखीव गटातून छायाबाई महाजन यांनी अर्ज मागे घेतले. आता सोसायटी मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे.

याबाबत अरुण पाटील म्हणाले, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे गेल्या महिनाभरापासून खेट्या घातल्या व जिल्हा बँकेसाठी आपल्या उमेदवारीचा विचार करावा, अशी विनंती केली. मात्र, त्या विनंतीचा विचार न झाल्याने आपण या निवडणुकीसाठी भाजपचा पाठिंबा मिळविला आहे.

Jalgaon Bank
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाथाभाऊ खडसेंपुढे कच्चा लिंबू ठरले?

ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्य करणारे माजी आमदार पाटील सोमवारी सकाळी जळगावमधील जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांना भेटले. जेडीसीसी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांनी माघार घेतल्याने आपण भाजप पुरस्कृत उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

माजी आमदार पाटील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे भावी उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू असल्याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी त्याबाबत स्पष्ट इन्कारही केला नाही. मात्र, त्या निवडणुकीसाठी अजून तीन वर्षे बाकी आहेत. त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे आपण निर्णय घेऊ. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक समोर असून, मतदारांचा मोठा पाठिंबा आपल्या मागे आहे, म्हणून आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com