खड्डे बुजविण्यासाठी स्वतः नगरसेवकाने हाती घेतले फावडे!

महापालिका प्रशासन दुर्लक्ष करते. सत्ताधारी पक्ष लक्ष देत नाही.
Jagdish Pawar
Jagdish PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महापालिका प्रशासन दुर्लक्ष करते. (Nashik Municiple Corporation) सत्ताधारी पक्ष लक्ष देत नाही. नागरिकांच्या अडचणी दूर होत नाही. (People complains about road) त्यावर असहाय्य होऊन बसेल तर तो नगरसेवक जगदीश पवार (Jagdish Pawar) कसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) या नगरसेवकाने आऊट ऑफ बॅाक्स Out of box initiative) जात स्वतःच फावडे घेतले आणि प्रभागातील रस्ते बुजविण्यास सुरवात केली आहे. नेहेमीच आपल्या वेगळ्या प्रयोगांनी चर्चेत असणाऱ्या या नगरसेवकाच्या या उपक्रमाने प्रभागातील नागरिक अक्षरशः आचंभित झाले.

Jagdish Pawar
खासदार हेमंत गोडसेंच्या तक्रारीने टोल कंपनीला २६ कोटींचा दंड!

नाशिक महापालिका स्मार्ट नाशिकवर शेकडो कोटींचा चुराडा करीत आहे. दुसरीकडे शहरातील व ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते पावसात वाहून जातात तेव्हा ते खड्डे बुजविण्यास मात्र त्यांना वेळ, निधी आणि उत्साह यापैकी काहीही नसते. श्री पवार यांच्या प्रभागातील विहितगाव- वडनेर या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पावसाने खड्डे पडले की खड्ड्यात रस्ता गेला काहीच समजत नाही. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश पावर यांनी प्रशासनाकडे व सत्ताधारी भाजपकडे वारंवार पाठपुरावा केला. नागिरकांनीही तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. नागिरकांच्या समस्या मात्र कायम होत्या. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी एैकता एैकता नगरसेवक पवार देखील हैरान झाले होते.

Jagdish Pawar
अहो सीमाताई चित्रा वाघ होण्याची घाई करू नका!

यावर उपाय काय? याचा विचार करून त्यांनी काल थेट एक ट्रॅक्टर मुरुम व दगड मागविले. स्वतः फावडे हातात घेतले आणि भरपावसात खड्डे बुजविण्यास सुरवात केली. खड्डे बुजविताना ते जा ये करणाऱ्या वाहनांना वाटही करून देत होते. त्यांचा हा उत्साह व सामाजिक कार्याची उर्मी पाहून परिसरातील नागरिकांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले.

यासंदर्भात श्री. पवार म्हणाले, नागरिक रस्ते नादुरुस्त झाल्याने त्रस्त आहेत. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी मी खुप पाठपुरावा केला. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. ते स्मार्ट सिटीची घोषणा करतात, मात्र शहरातील साधे रस्ते दुरुस्त करत नाहीत. याचा खेद वाटतो. दिर्घ काळ वाट पाहिल्यावर मी स्वतः रस्ता दुरुस्त केला. आता त्याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना हे वास्तव दाखविणार आहे.

सत्ताधारी भाजपचे विविध आंदोलने होतात. त्यात रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावली जातात. फलक लावले जातात. त्याला आगळे वेगले आंदोलन म्हणून पाठ थोपटून घेतली जाते. मात्र श्री. पवार यांनी स्वतः खड्डे बुजवून गांधीगिरीचे उदाहरण कार्यकर्त्यांपुढे ठेवले आहे.

श्री. पवार आरोग्यसेवक म्हणून शहरभर परिचीत आहेत. गेली अनेक वर्षे तसेच नगरसेवक होण्याआधीपासून ते महापालिकेच्या बिटको रुग्णालयात नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी स्वतः हजर राहून मदत करतात. विविध उपक्रम राबवितात. त्यांनी आजवर हजारो नागरिकांनी वैद्यकीय सेवा दिली आहे. अगदी कोरोना काळातही त्यांच्या या सेवाभावी उपक्रमात खंड पडला नव्हता. त्यामुळे ते नेहेमीच लोकांच्या चर्चेचा व कौतुकाचा विषय असतात.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com