शरद पवारांवर निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

माजी आमदार पंकज भुजबळांसह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडून नाशिक पोलिस आयुक्तांना निवेदन
Pankaj Bhujbal with NCP office bearers.
Pankaj Bhujbal with NCP office bearers.Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष, माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निंदाजनक टीका करत हत्येला प्रवृत्त करणारी पोस्ट आणि त्यांचा खून करण्याबाबत भडकावून वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल (Police action) करून तत्काळ अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (indecent criticism on social media about NCP leader Sharad Pawar)

Pankaj Bhujbal with NCP office bearers.
शरद पवारांना धमकावणारा निघाला नाशिकचा निखिल भामरे!

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार भूजबळ यांच्या नेतृत्वात नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Pankaj Bhujbal with NCP office bearers.
शिवसेनेच्या `धर्मवीर`ची भाजपच्या `काश्मीर फाईल्स`ला टक्कर!

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, संजय खैरनार, निवृत्ती अरिंगळे, समाधान जेजुरकर, सोनिया होळकर, डॉ. योगेश गोसावी, धनंजय निकाळे, किशोरी खैरनार, नंदन भास्करे, महेश भामरे, मनोहर कोरडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलिस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की अभिनेत्री केतकी चितळे हिने अॅड. नितीन भावेची पोस्ट शेअर करून खासदार शरद पवार यांच्यावर सोशल मिडियाद्वारे अतिशय खालच्या भाषेत निंदाजनक टीका केली आहे. या पोस्टमध्ये श्री.पवार यांच्या आजाराबाबत व व्यंगाबाबत हिणविण्यात आले असून त्यांची निंदा आणि थट्टा करण्यात आली आहे.

त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या आजाराबद्दल त्यांना हिणवणे अतिशय निषेधार्थ आणि गंभीर आहे. सदर पोस्टवर निखिल भामरे (बागलाणकर) याने देखिल खालच्या पातळीवरील पोस्ट टाकली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता वरील सर्वांवर विविध कायदेशीर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com