Eknath Shinde News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ?

Eknath Shinde Group`s MLAs are disturb after SC verdict-नाशिक जिल्ह्यातील आमदारांची अनेक कामे अद्याप शासकीय प्रक्रियेत असल्याने अडचणी...
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Shivsena News : सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून होणारा कालापव्यय कालपर्यंत शिंदे गटाला दिलासा देत होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांनंतर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झाले आहेत. (If Eknath Shinde will disqualify, supporter MLA may come in trouble)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाबरोबर गेलेले आमदार मतदारसंघाच्या विकासकामांसाठी बंडखोरी (Shivsena) केल्याचे सांगत आले आहेत. आता शिंदे अपात्र ठरल्यास त्यांच्या मतदारसंघातील (Nashik) विकासकामांचे भवितव्य काय? या प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आहेत.

CM Eknath Shinde
BJP Lok Sabha Strategy : मंत्रिपदाची अपेक्षा करू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; सर्व आमदारांना भाजप हाय कमांडचे आदेश ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना सोडलेल्या आमदारांत नाशिक जिल्ह्यातील दोघे तर उत्तर महाराष्ट्रातील एकूण सात आमदार आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत या पक्षाचे आमदार नाहीत. यातील दादा भुसे नाशिकचे, तर गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री आहेत. या मंत्र्यांमुळे त्या-त्या जिल्ह्यातील आमदारांचा प्रशासनात दबदबा आहे. ते अनेक कामे करून घेतात. या आमदारांना मोठी सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे.

मात्र, गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांच्या कालावधीत पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यात विधानसभा अध्यक्षांना एक तर याबाबत सुनावणी आणि निर्णय घ्यावा लागेल, अथवा सर्वोच्च न्यायालय याबाबत निर्णय घेण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे. कोणत्याही स्थितीत शिंदे गटात राजकीय अस्थिरता वाढली आहे.

नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांतील जे आमदार शिंदे गटाबरोबर सत्तेत आहेत, त्यांच्या मतदारसंघात शेकडो कोटींच्या विकासकामांच्या घोषणा झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या-त्या मतदारसंघात जाऊन त्याचे भूमिपूजन तसेच विविध घोषणा केल्या आहेत. ही सर्व कामे शासकीय प्रक्रियेत आहेत. याबाबत आमदार थेट विधाने करण्यास कचरतात, मात्र सोळा आमदार अपात्र ठरल्यास त्या कामांचे काय? या चिंतेने हे आमदार अस्वस्थ आहेत.

CM Eknath Shinde
Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षणाच्या बैठकीला काँग्रेस, ठाकरे गटाच्या खासदारांची दांडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com