Shrigonda Politics: श्रीगोंद्यात राष्ट्रवादीला बळ; तर बबनराव पाचपुतेंना दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का!

Babanrao Pachpute VS Rahul Jagtap: विद्यमान आमदार असूनही बबनराव पाचपुतेंच्या वर्चस्वावाला दुसऱ्यांचा सुरुंग
MLA Babanrao Pachpute and 
Rahul Jagtap
MLA Babanrao Pachpute and Rahul JagtapSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: अहमदनगरमधील श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाने 18 पैकी 11 जागा जिंकल्या. तर भाजपचे आमदार बबनराव पाचपुते आणि काँगेसचे राजेंद्र नागवडे यांच्या गटाने सात जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर सभापती पदासाठी दोन्ही गटांत मोठी रस्सीखेच झाली. मात्र, अखेर सभापतीपदी आणि उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या अतुल लोखंडे आणि मनिषा मगर यांची वर्णी लागली.

श्रीगोंदा बाजार समितीचे सभापतीपद आणि उपसभापतीपदाची माळ राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या गळ्यात पडल्यानंतर श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचं स्थान अधिक बळकट झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीत धक्का बसला.

MLA Babanrao Pachpute and 
Rahul Jagtap
Siddaramaiah Oath Ceremony : सिद्धरामय्यांच्या शपथविधीसाठी उद्धव ते ममता सर्वांनाच निमंत्रण ! काय आहे कारण ?

याआधीही श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांना आव्हान दिले होते. त्यामध्येही बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसला होता.

काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत 10 सदस्य बबनराव पाचपुते यांचे तर 7 सदस्य साजन यांचे निवडून आले होते. मात्र, तरीही सरपंचपद साजन पाचपुते यांच्याकडेच गेले होते. आता श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीतही साजन पाचपुते यांनी राहुल‎ जगताप यांच्याबरोबर जात त्यांच्या पॅनलला पाठिंबा दिला होता.

MLA Babanrao Pachpute and 
Rahul Jagtap
Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe Patil: राम शिंदे-विखे पाटलांमधील वादावर फडणवीस काय मार्ग काढणार ?

आता श्रीगोंदे बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तब्बल 11 जागा मिळवल्या. पण विद्यमान आमदार असूनही बबनराव पाचपुते यांना मात्र, पाहिजे तेवढे यश मिळवता आले नाही. त्यामुळे याचा फटका आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, राहुल जगताप यांच 'परफेक्ट' नियोजन आणि तालुक्यातील जुन्या-नव्यांचा मेळ घालत राष्ट्रवादीचं स्थान अजून बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर कधीकाळी श्रीगोंद्यात पाचपुते यांचे मोठे वर्चस्व होते. पण आता विद्यमान आमदार असूनही बबनराव पाचपुतेंच्या वर्चस्वावाला दुसऱ्यांचा सुरुंग लागला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com