Satara news:कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील (Pune Hit And Run Case) अगरवाल कुटुंबाबाबत अनेक गोष्टी उघड होत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अगरवाल यांच्या अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवा, अशा सूचना दिल्यानं अगरवाल यांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार हे स्पष्ट झाले आहे.
"महाबळेश्वरमध्ये कोणी बेकायदेशीर बंधकाम करत असेल किंवा रिसॉर्ट बांधत असेल मग तो अगरवाल असेल अथवा अन्य कोणी बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर फिरवा," अशी सक्त सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
या अपघातातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी महाबळेश्र्वर येथील शासकीय जागेत रिसॉर्ट उभे केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी मिळवलेल्या माहितीतून हे सर्व उघड झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, "अनधिकृत बांधकाम करणारा कोणीही असू द्या अगरवाल असो वा अन्य कोणी माझी जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना आहे, बेकायदेशीर असेल तर बुलडोझर लावून तोडून टाका. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही,"
"महाबळेश्वर हा निसर्ग संपन्न प्रदेश आहे, येथील निसर्गसंपदेत वाढ होण्यासाठी आम्ही वृक्ष लागवड सारखा उपक्रम राबवत आहोत.अशा परिस्थितीत कोणी येथे अतिक्रमण किंवा रिसॉर्ट बांधत असेल, तर मग तो अगरवाल असो व अन्य कोणी बेकायदेशीर असेल तर कारवाई होणारच," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जीएसटी आयुक्तांनी केलेल्या जमीन खरेदी विषयी मुख्यमंत्री म्हणाले,"याची माहिती मला मिळाली आहे. याबाबतही बेकायदेशीर असेल तर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. या परिसरतील लोकांना माझी विनंती आहे त्यांनी आपली जमीन विकू नये, कारण हीच जमीन तुम्हाला पुढे चांगले उत्पन्न मिळवून देणारा आहे. याभागात आम्ही पर्यटनाला चालना देणार आहोत जेणे करून येथील लोकांना रोजगार मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.