Dindori APMC : झिरवळांच्या मतदारसंघात झाला युवा नेतृत्वाचा उदय!

रामदास चारोस्कर, गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी परिवर्तन घडवले.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama

NCP established leader defeated : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने बाजी मारत १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवीत दिंडोरी बाजार समितीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तू पाटील यांच्या शेतकरी उत्कर्ष पॅनलला अवघ्या पाच जागा मिळाल्या. (Shocking result in Dindori APMC for eastablished NCP leaders)

दिंडोरी (Nashik) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांचा मतदारसंघ आहे. मात्र प्रस्थापित व गर्विष्ठ नेत्यांच्या आडमुठेपणामुळे श्री. झिरवाळ, श्रीराम शेटे या नेत्यांना प्रचारापासून लांब रहावे लागले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीचे पडसाद येथे उमटले आहेत. दुखावलेल्या तरुण कार्यकर्त्यांनी येथे परिवर्तन घडवले. हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना धक्का मानला जातो.

Narhari Zirwal
Nashik APMC Result : ना महाविकास आघाडी, ना भाजप, मतदारांचा प्रस्थापितांना कौल

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत विद्यमान सभापती दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्कर्ष पॅनलची निर्मिती झाली तर गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, सहकार नेते सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे, शहाजी सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलची निर्मिती झाली होती. तीत परिवर्तन पॅनलला ११ जागा तर शेतकरी उत्कर्ष पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत व्यापारी गटाने तटस्थ भूमिका घेऊन कोणत्याही पॅनलकडून निवडणूक न लढवता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.

Narhari Zirwal
Sinnar APMC election : आमदार कोकाटेंच्या सत्तेला धक्का; वाजे, कोकाटेंना समान जागा!

विजयी उमेदवार असे (कंसात मते)

सहकारी संस्था (सर्वसाधारण)- प्रशांत कड- ३४२, गंगाधर निखाडे ३४१, नरेंद्र जाधव ३२८, पांडुरंग गडकरी ३२६, कैलास मवाळ ३२१, बाळासाहेब पाटील ३१५, दत्तात्रय पाटील ३५०. सहकारी संस्था (इतर मागास प्रवर्ग)-प्रवीण जाधव ३७८. सहकारी संस्था ( भटक्या जमाती)- श्याम बोडके ३३८. सहकारी संस्था (महिला राखीव). विमल जाधव ३४५, अर्चना अपसुंदे ३४७. ग्रामपंचायत (सर्वसाधारण)- दत्तू भेरे ५१०, योगेश बर्डे ५०६. ग्रामपंचायत (अनु.जाती जमाती)- दत्ता शिंगाडे ५३२. ग्रामपंचायत (आर्थिक दृष्ट्या दुर्बल)- दत्तू राऊत ५५५. व्यापारी मतदार संघ- नंदलाल चोपडा ३०६, अमित चोरडीया ३२६. हमाल तोलारी- सुधाकर जाधव २४.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com