Nashik APMC Result : ना महाविकास आघाडी, ना भाजप, मतदारांचा प्रस्थापितांना कौल

कळवण, सिन्नर, घोटी, देवळ्यात सत्ताधाऱ्यांना कौल देत मतदारांचा सुचक इशारा
Nitin Pawar, Manikrao Kokate, Keda Aher & Sandip Gulve
Nitin Pawar, Manikrao Kokate, Keda Aher & Sandip GulveSarkarnama
Published on
Updated on

Nashik APMC result : जिल्ह्यातील पाचपैकी चार बाजार समित्यांमध्ये मतदारांनी सत्ताधाऱ्यांनाच कौल दिला आहे. दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित नेतृत्वाला मोठा धक्का बसला. कळवण, सिन्नर, देवळा व इगतपुरीमध्ये आमदारांना कौल मिळाला. (APMC election indicate alert for ruling party)

जिल्ह्यातील (Nashik) बारा बाजार समित्यांच्या निवडणुकीचे (APMC election) मतदान काल झाले. त्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) कळवणला सरशी झाली. आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या सत्तेचे भवितव्य फोडाफोडी किंवा चिठ्ठीवर ठरणार आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दत्तात्रय पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

Nitin Pawar, Manikrao Kokate, Keda Aher & Sandip Gulve
Nashik District Bank issue : प्रभावशाली, बडे थकबाकीदारांमुळेच जिल्हा बँक संकटात

दिंडोरी बाजार समितीत मात्र परिवर्तन झाले आहे. दिंडोरी बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती दत्तात्रय पाटील यांच्या प्रदीर्घकाळ राहिलेली सत्ता उलथून लावत माजी आमदार रामदास चारोस्कर, गणपत पाटील यांच्या पॅनलने परिवर्तन घडविले. कळवणला आमदार नितीन पवार व माजी सभापती धनंजय पवार यांनी १८ पैकी १५ जागा जिंकत आपला गड शाबूत ठेवला आहे. माजी आमदार जे.पी. गावित, माजी सभापती रवींद्र देवरे यांच्या पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

पाच बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक उत्कंठावर्धक राहिलेल्या सिन्नरमध्ये आमदार अॅड. माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या पॅनलमध्ये काटे की टक्कर बघायला मिळाली. कोकाटे आणि वाजे यांनी समसमान नऊ जागांवर विजय मिळविला आहे. देवळा बाजार समितीत भाजपने आपला गड कायम ठेवत सत्ता कायम ठेवली आहे. घोटीत अॅड. संदीप गुळवे आणि गोरख बोडके यांच्या पॅनलवर मतदारांना पुन्हा विश्वास टाकला आहे.

Nitin Pawar, Manikrao Kokate, Keda Aher & Sandip Gulve
Sinnar APMC election : आमदार कोकाटेंच्या सत्तेला धक्का; वाजे, कोकाटेंना समान जागा!

जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यातील कळवण, दिंडोरी, सिन्नर, देवळा आणि घोटी बाजार समित्यांची मतमोजणी सायंकाळी उशिराने झाली. दिंडोरीत अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत दत्तात्रेय पाटील यांचे २६ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला असून विरोधी परिवर्तन पॅनलने ११ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. येथे सर्व पक्षांना फुटीचा सामना करावा लागत राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार असलेल्या दोन सर्वपक्षीय पॅनल मध्ये लढत झाली. यात माजी आमदार रामदास चारोस्कर, बाजार समितीचे संस्थापक चेअरमन गणपतराव पाटील, प्रकाश शिंदे, भाजपचे नरेंद्र जाधव, योगेश बर्डे आदींचे साथीने सत्ता परिवर्तन केले आहे.

सिन्नरमध्ये विद्यमान आमदार कोकाटे व माजी आमदार वाजे, उदय सांगळे यांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. यात कोकाटे पॅनलला नऊ तर वाजे पॅनलला देखील नऊ जागांवर विजय मिळाला आहे. कळवणमध्ये आमदार पवार व धनंजय पवार यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवत १५ जागांवर बाजी मारली आहे. देवळात दहा जागा बिनविरोध करत भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी बाजी मारली असताना मतदान झालेल्या आठ जागांमध्येही त्यांनी आपले वचस्व कायम ठेवले आहे.

Nitin Pawar, Manikrao Kokate, Keda Aher & Sandip Gulve
Deola APMC election : भाजप-राष्ट्रावादीची भाऊबंद संपली पण कार्यकर्ते दुरावले?

घोटी बाजार समितीत अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आमदार शिवराम झोले, अॅड संदीप गुळवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी नेतृत्वाखालील लोकनेते गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलने विरुद्ध असलेल्या शेतकरी परिवर्तनाच्या पॅनलचा धुवा उडवत १६ जागांवर विजय मिळवला. विजयाची घोषणा झाल्यानंतर सर्व समर्थकांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com