Devidas Pingle News : सुनावणी रद्द झाल्याने देविदास पिंगळे यांना दिलासा!

मुख्यमंत्र्यांसमोर होणारी सुनावणी पुढे ढकलल्याने देविदास पिंगळेंना विरोधकांना धक्का
Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Devidas Pingle & Shivaji ChumbhaleSarkarnama
Published on
Updated on

Relief for Devidas Pingle : कोरोनाकाळात कृषी उत्पन्न बाजार समितीने गोरगरिबांना धान्यवाटपात घोटाळा केल्याच्या आरोपाचा उच्च न्यायालयात पोचलेल्या वादाने नवीन वळण घेतले आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्याचे पणनमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी ठेवली होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ही सुनावणी रद्द करीत पुढे ढकलण्यात आली आहे. (Nashik APMC case hearing postpone by CM Office)

सुनावणी पुढे ढकलल्याने माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांना दिलासा, तर विरोधकांना पुन्हा धक्का बसला आहे. बाजार समितीने (APMC election) कोरोनाकाळात (Covid) मदतीसाठी पुढे येत गरिबांना मोफत अन्नधान्याचे वाटप केले होते. या धान्यवाटपात भ्रष्टाचार केल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली होती.

Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Pachora News : अयोध्येच्या धर्तीवर पाचोऱ्यात श्रीराम मंदिर

त्यावर प्रकरणाची चौकशी करून बाजार समितीच्या संचालक मंडळाला दोषी ठरवून त्यांच्याकडून संबंधित खर्च वसूल करण्याचे आदेश दिले होते. उपनिबंधकांच्या या आदेशाविरुद्ध संचालक मंडळाने तत्कालीन पणन संचालकांकडे अपील केले असता, त्याच्या सुनावणीत संचालक मंडळाला ‘क्लीन चिट’ देण्यात आली होती.

त्यावर माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी सहकारमंत्र्यांकडे अपील दाखल केले. या अपिलावर २४ मार्चला सुनावणी घेण्यात आली. सुनावणीची नोटीस संचालक मंडळाला २५ मार्चला मिळाली होती. मात्र, संचालक मंडळ उपस्थित नसल्याचे कारण देत पणन संचालकांचे आदेश रद्द करण्यात आल्याचा निकाल दिला होता.

Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Yeola Water scarcity News : पाणीटंचाईच्या प्रस्तावांना तरी मान्यता द्या!

दरम्यान, या निर्णयाविरोधात बाजार समितीच्या संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेत सुनावणीच्या संचालकांना बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यावर राज्य सरकारने १० एप्रिलला पणनमंत्र्यांकडे सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार बाजार समितीचे संचालक देवीदास पिंगळे यांच्यासह अन्य संचालकांना शुक्रवारी राज्य सरकारकडून नोटिस प्राप्त झाली होती. सोमवारी मंत्रालयात पणनमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र अवकाळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा असल्याकारणाने ही सुनावणी रद्द करीत पुढे ढकलण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com