घरबसल्या दहा-पंधरा ट्विट करुन रडीचा डाव खेळतात! जयंत पाटलांचा रोख कुणावर?

माजी आमदार मु.ग.पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयंत पाटील बोलत होते.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : शेतकरी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर शेतकरी दिंडी काढून शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्रभर जनसंपर्क करीत असतात. याचवेळी काही जण मात्र, घरबसल्याच दहा-पंधरा ट्विट करून रडीचा डाव खेळतात, असा टोला जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नाव घेता लगावला.

चांदसर (ता.धरणगाव ) येथे माजी आमदार मु.ग.पवार यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. ते म्हणाले की, आमदार मु.ग.पवार यांनी आयुष्यभर शरद पवार यांना साथ दिली. ते जनतेच्या प्रश्‍नासाठी समरस होते. त्यांनी प्रत्येक लढ्यात शरद पवार यांची सोबत केली. शरद पवार यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी संघर्ष केला, जळगाव ते नागपूर पायी शेतकरी दिंडी काढली, तसेच ते महाराष्ट्रभर जनतेशी संपर्क करीत असतात. आज काही जण मात्र घरबसल्या दहा ते पंधरा ट्विट करून रडीचा डाव खेळत असतात.

Jayant Patil
पोलिसांचा प्रताप! आधीपासून तुरुंगात असलेल्या तिघांना बनवलं रामनवमीच्या हिंसाचारातील आरोपी

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याविरूध्द चौदा ट्विट केले होते. त्यावर पाटील यांनी नाव न घेता टोला लगावला. पवार हे राज्यभर फिरून सर्व सामान्यांशी नाळ जोडत असतात, असेही पाटील यांनी नमूद केले. यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे.

Jayant Patil
राज्यांकडं बोट दाखवून वाढत्या पेट्रोल, डिझेलवर पेट्रोलियम मंत्र्यांनी झटकले हात!

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शरद पवारांवरील टीकेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी फडणवीस यांनी पवारांच्या भूमिकांबाबत 14 ट्विट करत टीका केली होती. फडणवीस यांनी पहिल्या ट्विटमध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पवारांनी मांडलेल्या भूमिकेवरून टीका केली होती. एका बाजूला आपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी आहोत. त्यांचा कलम 370 ला विरोध होता. पण आंबेडकरांच्या तत्वांविरोधात काय बोलले जातेय ते पहा, असं ट्विट करत फडणवीस यांनी त्यासोबत कलम 370 हटवल्यानंतर पवारांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेचे वृत्त जोडले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com