मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. आतापर्यंतची ही वाढ 10 रुपयांवर गेली आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू होती. मात्र, यातून सुटका होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण पेट्रोलियम मंत्र्यांनी दरवाढीबाबत हात झटकून थेट राज्यांकडं बोट दाखवलं आहे. (Petrol Diesel price hike News)
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना वाढत्या इंधन दरांबद्दल विचारणा करण्यात आली. या वेळी त्यांनी हात झटकण्याची भूमिका घेतली. ते म्हणाले की, इंधनाचे दर नियंत्रणात असावेत, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात आम्ही कपात केली होती. राज्य सरकारांनीही असेच पाऊल उचलावे, असे आम्ही म्हटले होते. भाजपशासित सर्व राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केली आहे. आता छत्तीसगडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 24 टक्के व्हॅट आहे. तो 10 टक्क्यांवर आणल्यास पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होईल. जेव्हा विक्री वाढत असतो त्यावेळी 10 टक्के व्हॅटही खूप होईल.
सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली होते. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले आहेत. मागील 9 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी आधीच दिला होता.
देशात महागाईचा भडका उडाल्याने मागील वर्षी मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. या निवडणुका संपल्या असून, या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याचा अंदाज आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.