रक्षा खडसेंचा अर्ज बाद कसा काय झाला? राष्ट्रवादीच्या नेत्यानेच उपस्थित केला प्रश्न

भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून (NCP) उत्तर देण्यात आले आहे.
Raksha Khadse
Raksha KhadseSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या भाजप खासदार रक्षा खडसेंचे (Raksha Khadse) जिल्हा बँक संचालक पदासाठी दोन अर्ज बाद कसे होवू शकतात? भाजपच्या (BJP) उमेदवारांनी त्रुटी ठेवूनच अर्ज भरले का? असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील (Satish Patil) यांनी उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आज (ता.23 ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील आदी उपस्थित होते.'''

Raksha Khadse
कितीही त्रास द्या, एकनाथ खडसे सहीसलामत सुटतील!

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यावर सत्तेचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद केले, असा आरोप केला होता. याबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले, की, भारतीय जनता पक्षाच्या खासदार, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनी बँकेत संचालक मंडळाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता. खासदार रक्षा खडसे ह्या तर खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या आहेत, मग त्यांचाही अर्ज कसा बाद झाला? अर्जावर सूचकांची स्वाक्षरी आवश्‍यक असते हे त्यांच्या लक्षात का आले नाही? असा सवाल डॅा पाटील यांनी उपस्थित केला.

Raksha Khadse
मंदाकिनी खडसे ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या; पण...

याबरोबरच, माजी आमदार स्मिता वाघ यांचाही अर्ज बाद झाला त्यांच्याकडे अनुभव असतानही त्यांनी त्रुटी कशा ठेवल्या? भाजपच्या उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित भरले नाहीत, त्यात अनेक त्रुटी ठेवल्या. त्यांना निवडणूक लढावयाचीच नसल्याने त्यांनी या त्रुटी ठेवल्या का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीने सत्तेचा कोणताही दुरूपयोग केला नाही. आमच्याकडे भाजप उमेदवारांच्या विरोधात पुरावे असतानाही आम्ही ते दिले नाहीत, त्यांनी लढावे अशी आमची इच्छा आहे. उलट भाजपच्या नेत्यांनीच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात हरकती घेवून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्यांना पुरव्यानिशी उत्तरे दिली. त्यामुळे आम्ही सत्तेचा वापर करून उमेदवारी अर्ज बदलले हा भाजपचा आरोप हास्यास्पद असल्याचे सांगत भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपाचे खंडन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com