मंदाकिनी खडसे ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या; पण...

मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी (ED) कार्यालयात हजेरी लावण्याचे निर्देश दिले होते.
Mandakini Khadse
Mandakini Khadsesarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना न्यायालयाने दिलासा दिला होता. उच्च न्यायालयाने ईडीला त्यांना तृर्तास अटक न करण्याते आदेश दिले होते. त्याच बरोबर उच्च न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. तपासयंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे व मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी (ED) कार्यालयात हजेरी लावण्याचे निर्देश दिले होते. त्या प्रमाणे आज (ता. १९) मंदाकिनी खडसे या मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये हजेरी लावण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, कार्यालय बंद असल्याने त्यांना परत जावे लागले.

Mandakini Khadse
काँग्रेस होणार आक्रमक; नव्या शहराध्यक्षांना नानांचा आदेश

या वेळी बोलताना मंदाकिनी खडसे यांच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे येथे आलो आहे. मात्र, कार्यालय बंद आहे. न्यायालयाने आम्हाला तपासता सरकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच प्रमाणे आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करत आहोत. सत्र न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॅारंट विरोधात खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने काही अटी शर्तींवर खडसेंना अटक न करण्याते आदेश दिले होते.

Mandakini Khadse
खतगावकर आले, अजूनही बरेच येणार ; शंकररावांच्या काळातील काॅंग्रेस पुन्हा उभारू

पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याप्रकरणी खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. खडसे यांच्या पत्नी आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची नोंद केली. एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com