मोठी बातमी : कॉग्रेसकडून विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव निश्चित

शरद रणपिसे यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून (congress) प्रज्ञा राजीव सातव (pradnya satav) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
Pradnya Satav
Pradnya Satav sarkarnama

मुंबई : विधानपरिषदेतील (legislative council) काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून (congress) प्रज्ञा राजीव सातव (pradnya satav) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याचे पक्षाने निश्चित केले असल्याचे सुत्रांनी सांगितलं. या जागेसाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छूक होते. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची देखील माहिती आहे.

राज्यसभेचे खासदार असलेले राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना सक्रीय राजकारणात उतरवण्याची काँग्रेसची भूमिका आहे. राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी डॉ प्रज्ञा सातव यांना या जागी संधी दिली पाहिजे असाही मतप्रवाह पक्षात आहे. राजीव सातव यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेसाठी संधी द्यावी, असे कॉग्रेसमधील अनेकांचे मत आहे. राज्यसभेचे खासदार असताना राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं.

विधानपरिषदेच्या या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाचीही चर्चा आहे. गांधी कुटुंबियांशी असलेले राजीव सातव यांचे संबंध लक्षात घेता प्रज्ञा सातव यांच्याविरोधात कुठलीच खेळी यशस्वी होणार नाही आणि त्या विधान परिषदेवर जातील असं काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

Pradnya Satav
साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला : शरद पवार

राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी कॉग्रेचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधींची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीनंतरच प्रज्ञा सातव राजकारण सक्रिय होणार याची चर्चा सुरु झाली. नंतर त्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही भेटल्या. हिंगोली-कळमनुरी परिसरात प्रज्ञा सातव सध्या सक्रिय आहेत. विधानपरिषदेच्या या जागेसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान आहे, तर १६ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

राज्यसभेचे खासदारपद रजनीताई पाटील यांना देण्याचा निर्णय कॉग्रेस हायकमांडनं घेतला. त्यामुळे राज्यात विधानपरिषदेच्या माध्यमातून सातव कुटुंबाला भविष्यातल्या राजकारणासाठी ताकद दिली जाते का याचीही उत्सुकता होती. अखेर प्रज्ञा सातव यांनाच संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. शरद रणपिसे यांच्या निधनानंतरची उर्वरित चार वर्षांची टर्म म्हणजे 27 जुलै 2024 पर्यंतची टर्म नव्यानं निवडून आलेल्या आमदारास मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com