Sharad Pawar News : केंद्राचे मंत्री, खासदारांनी हात टेकले, तिथे शरद पवार कामाला आले!

NCP leader Sharad Pawar solve the land acquisition issue of Farmers-सुरत-चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्री, खासदार सगळेच असहाय झाले होते.
Sharad Pawar with Nashik Farmers
Sharad Pawar with Nashik FarmersSarkarnama

Maharashtra Politics : सुरत-चैन्नई महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मातिमोल भावात संपादित केल्या जात होत्या. हा मतदारसंघ भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा व एकनाथ शिंदे गटाच्या खासदाराचा मात्र या दोघांनाही प्रशासनाने जमू दिले नाही. अखेर अनुभवी व शेतकऱ्यांसाठी नेहेमीच धावून येणाऱ्या शरद पवार यांनी ते करून दाखवले. (Chennai-Surat Green field highway land acquisition was a serious matter for Farmers)

नाशिक (Nashik) व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) जमीनी सुरत-चैन्नई महामार्गासाठी संपादीत केल्या जाणार आहेत. मात्र त्यात राज्य सरकारकडून दर देण्याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यात लक्ष घातले.

Sharad Pawar with Nashik Farmers
Maratha Reservation: जखमींना भेटण्यासाठी जरांगे पाटील रात्री दीडला रुग्णालयात गेले!

यासंदर्भात समृद्धी महामार्गाच्या तुलनेत या जमीनींना अत्यल्प दर दिला होता, याशिवाय जमिनीचा सर्व्हे देखील वस्तुस्थितीदर्शक नव्हता. मात्र आता त्याची अधिसूचना निघाली असल्याने काहीच करता येत नाही अशी भूमिका भूसंपादन विभागाने घेतली होती. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यात या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या कायद्याच्या चौकटीतून मार्ग काढता आला नव्हता. त्यामुळे राज्यमंत्री, खासदार असहाय्य दिसले.

शेतकऱ्यांच्या जमिनी मातिमोल भावात भूसंपादित केल्या जात आहेत. याबाबत माजी आमदार अनिल कदम यांनी शेतकऱ्यांतर्फे हा प्रश्‍न ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मांडला. त्यांनी मात्र दिल्लीत या मार्ग काढू असा शब्द दिला. हे शेतकरी माजी आमदार अनिल कदम राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पदाधिकारी, नेत्यांसह दिल्लीला श्री. पवार यांना भेटले.

यावेळी श्री. पवार यांनी शेतकऱ्यांना घेऊन केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यात हा प्रश्न मांडला. त्यावर श्री. पवार, गडकरी यांनी शेतकऱ्यांतर्फे निवृत्त अधिकारी शिवाजी देशमुख यांचा लवाद म्हणून नेमणुक करा, असा सल्ला दिला. त्यामुळे या प्रश्नात शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली. जीथे सत्ताधारी पक्षानेही सर्व दरवाजे बंद केले होते, तीथे शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवा दरवाजा खुला केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसले.

Sharad Pawar with Nashik Farmers
Vijaykumar Gavit News : गावित हे तर स्वतःच्या कुटुंबाचे पालकमंत्री होते!

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोंडाजीमामा आव्हाड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, प्रदेश कार्याध्यक्ष पुरषोत्तम कडलग, प्रकाश शिंदे, महामार्ग बाधीत शेतकरी भाऊसाहेब गोहाड, किरण पिंगळे, विकास गामने, अनिल कांडेकर, दशरथ केदार, राजेश खांदवे, राजाराम कांडेकर, प्रकाश शिंदे, साहेबराव पिंगळे यांनी श्री. पवार यांच्याकडे हा प्रश्न मांडला.

Sharad Pawar with Nashik Farmers
Satara Political News : ललित पाटलांशी संबंध नाही; अंधारेंवर कायदेशीर कारवाई करणार : शंभूराज देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com