जयंत पाटील म्हणाले, तुमचे प्रश्न सोडविणार!

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात आमदार हिरामण खोसकर यांसह विविध नेते उपस्थित होते.
Irrigation Minister Jayant Patil News,  Nashik News
Irrigation Minister Jayant Patil News, Nashik News
Published on
Updated on

इगतपुरी : धरणांचा तालुका (Nashik) इगतपुरीच्या प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्न लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आमदार हिरामण खोसकरांसह (Hiraman Khoskar) वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांना मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. (irrigation minister assures project affected farmers)

Irrigation Minister Jayant Patil News,  Nashik News
एकनाथ खडसेंना ६ वर्षांनी गुड न्यूज...विधान परिषदेची उमेदवारी जाहीर!

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात आमदार हिरामण खोसकरांसह वैतरणा धरणग्रस्त व शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे मंगळवारी झाली. स्थानिक नेतेमंडळी, वैतरणा धरणग्रस्त व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी, असा आग्रह आमदार हिरामण खोसकर यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केला होता. यावर संमती दर्शवीत आमदारांसमवेत स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. (Jayant Patil News)

Irrigation Minister Jayant Patil News,  Nashik News
शिवसेनेचे आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात शेलार गेले अन् केसरकरांशी बोललेही!

बैठकीत वैतरणा धरणातील संपादित जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा सुरू ठेवला होता. शासनाने संमती दर्शविली असून मूल्यांकन व मोजमाप करून जमिनी मूळ मालकांना परत करण्याबाबत शासनस्तरावर आदेश होऊनही अद्यापपावेतो जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाकडून मूळ शेतकऱ्यांच्या नावे जमीन हस्तांतरित करून सातबारा उतारा नावे होण्यास दिरंगाई होत असल्याने श्री.

खोसकर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरून, अगोदर जमिनी नावावर करा, त्याशिवाय धरणावर कुठलेही सर्वेक्षण अथवा पाण्याचा विसर्ग सोडण्यासाठी हालचाली करण्यात येऊ नयेत, अशी ठाम भूमिका मांडली होती.

मुंबई महापालिकेला व मराठवाड्यात नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मुंबई महापालिकेत व औरंगाबाद/जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाव्यात, अशी ठाम भूमिका मांडली.कावनई-सांजेगाव थेट पूल व रस्ता व्हावा जेणेकरून नांदडगाव, सांजेगाव, मोडाळे, शिरसाटे, कुशेगाव आदी गावांना घोटी बाजारपेठ व इगतपुरी येथे जाण्यास दळणवळण सोयीस्कर होईल व पर्यटनाला वाव मिळून नैसर्गिक सौंदर्यात भर पडेल. तालुक्यातील धरणांमध्ये मासेमारीसाठी स्थानिक मच्छीमारांना परवानग्या मिळाव्यात, स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी धरणाच्या पाण्यामध्ये आरक्षण द्यावे या विविध मागण्या बैठकीत मांडत मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.

बैठकीत आमदारांसमवेत माजी आमदार शिवराम झोले, ज्येष्ठ नेते संदीप गुळवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, युवानेते उमेश खातळे यांच्यासह स्थानिक शेतकरी, विविध सरपंच, पदाधिकाऱ्यांनी ३०-४० वर्षांपासून प्रलंबित स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडून प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मंत्र्यांसमोर मांडल्या. या वेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सर्व प्रश्नांबाबत प्रतिसाद दाखवत लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com