Ajit Pawar मुख्यमंत्री होऊ शकतात..; खडसेंनी मांडले अजितदादांच्या सीएमपदाचं गणित

Eknath Khadse Big Claim About Ajit Pawar : अजित दादांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा ते अजित पवार हे भाजपसोबत गेले नव्हते ते राष्ट्रवादीतच होते.
Eknath Khadse ,Ajit Pawar
Eknath Khadse ,Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse Big Claim About Ajit Pawar : मुख्यमंत्री (Chief Minister) पद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. एकाच वेळी प्रसारमाध्यमे आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात अजित पवार आणि मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरु आहेत.

अजित पवार हे महाविकास आघाडी पक्षातून बाहेर पडून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा एका बाजूला आहे. तर दुसरीकडे जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार, असे खुद्द अजित पवारच सांगत आहेत.

Eknath Khadse ,Ajit Pawar
Appasaheb Dharmadhikari News : 'माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर.., मी पुरस्कार परत करणार'; धर्माधिकारी 'ते' पत्र खोटे

'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

"पुढच्या कालखंडात अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका”, असं मोठं विधान एकनाथ खडसे यांनी केल आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, "राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. हे भाजपमध्ये जातील, असं मला वाटत नाही. याबाबत त्यांनी याचा विचारही केला असावा. अजित दादांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा ते अजित पवार हे भाजपसोबत गेले नव्हते ते राष्ट्रवादीतच होते”

Eknath Khadse ,Ajit Pawar
Sanjay Raut Praised Ajit Pawar: आमच्यामध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव; राऊतांचा नवा शोध; अजितदादा गोड माणूस..

हा तर खोक्यांचा खेळ..

“अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलयं. यात गैर काय? ”, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. “एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणता आकड्याचा खेळ होता? हा तर खोक्यांचा खेळ जमला”, असे खडसे म्हणाले. 'अजित पवार हे मुख्यमंत्री होई शकतात,'असे सांगून खडसेंनी अजित पवार हे कशा प्रकारे मुख्यमंत्री होऊ शकतात, याचे गणित मांडले आहे.

Eknath Khadse ,Ajit Pawar
Ajit Pawar On Pune Loksabha: प्रशांत जगतापांना अजितदादांनी दिल्या शुभेच्छा; पुण्याच्या जागेबाबत सूचक विधान

अजितदादा १४५चा आकडा जमवू शकतात..

एकनाथ खडसे म्हणाले, "सध्या राजकारणात काही घडू शकतं.सुप्रीम कोर्टाचा जजमेंट झाल्यानंतर नेमकं काय येतं हे मला माहिती नाही. मात्र यातील 16 आमदार हे अपात्र झाले तर राजकारणातलं चित्र आणखी बदलू शकतो. जो 145 चा आकडा पूर्ण करेल तोच यानंतर मुख्यमंत्री होईल. कदाचित अजित दादा हे मुख्यमंत्री होण्याचा 145 चा आकडा जमवू शकतात, ते मुख्यमंत्री होऊ शकतात,"

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com