Ajit Pawar On Pune Loksabha: प्रशांत जगतापांना अजितदादांनी दिल्या शुभेच्छा; पुण्याच्या जागेबाबत सूचक विधान

Ajit Pawar Wishes Prashant Jagtap: 'पुण्याचे भावी खासदार प्रशांत जगताप'
Ajit Pawar Wishes Prashant Jagtap
Ajit Pawar Wishes Prashant JagtapSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या जागी कोण खासदार होणार ? याबाबत सर्व पक्षामध्ये चर्चा सुरु आहे. काही इ्च्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पुण्याचे भावी खासदार म्हणून शहरात काही नेत्यानी फलकबाजी सुरु केली आहे.

यावरुन राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या 'भावी खासदारांना" मिश्किलपणे टोला लगावला. या जागेवर काँग्रेसकडून आधीच दावा करण्यात आला आहे. मात्र, राष्च्रवादीकडून अद्याप अधिकृत, ठोस भाष्य कोणी केले नव्हते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Maharashtra News)

Ajit Pawar Wishes Prashant Jagtap
Ajit Pawar News: "मला 'त्या' कार्यक्रमाचं निमंत्रणच नव्हतं.." ; अजितदादाचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा वाढदिवस नुकताच झाला, यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देतानांचे फलक झळकले होते. या फलकावर जगताप यांचा 'पुण्याचे भावी खासदार प्रशांत जगताप,' असा उल्लेख करण्यात आला होता. या फलकामुळे राष्ट्रवादीसह काँग्रेस-भाजपमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Ajit Pawar Wishes Prashant Jagtap
Ajit Pawar News : कोण संजय राऊत ?; अजितदादांनी वात पेटवली...

प्रशांतच्या मनात काय ?

अजित पवार म्हणाले, "प्रशांत जगताप यांना खासदार होण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. पुणे लोकसभेचा उमेदवार घटक पक्ष एकत्र बसून ठरवू. मात्र, नवा चेहरा दिल्यास जनताही त्याला पसंत करते. प्रशांतच्या मनात काय आहे, हे आधी जाणून घेतो. मग माझ्या मनातले सांगतो. प्रशांत माझा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीने त्याला आजवर विविध पदे दिली आहेत,"

Ajit Pawar Wishes Prashant Jagtap
Sunstroke Deaths : नितीन करीरांना उगाच बदनाम का करावे, ते सरकारच्या चुकीची चौकशी करतील का? ; राष्ट्रवादीचा सवाल

"पुणे जिल्ह्यात पुणे, मावळ, शिरूर, बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघात की राज्यसभा खासदार म्हणून प्रशांत इच्छुक आहे ठाऊक नाही," असेही ते म्हणाले.

मी निवडणूक अधिकारी नाही...

निवडणुका कधी होणार, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, "मी निवडणूक अधिकारी नाही. जेव्हा निवडणूक अधिकारी होईन तेव्हा मी नक्की सांगेन की निवडणुका कधी होतील. फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्यावेळी अनेक इच्छूकांनी तयारी केली. देव दर्शन केले. निवडणुका काही झाल्या नाहीत. आता सर्व इच्छूक कंटाळले आहेत,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com