MLA Prajakt Tanpure : ''सत्ताधाऱ्यांबरोबर गेलो असतो तर...'' आमदार तनपुरेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

NCP MLA Tanpure : ''मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार केले, त्यांनी...'' असंही तनपुरेंनी बोलून दाखवलं आहे.
MLA Tanpure
MLA TanpureSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : माजीमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे (शरद पवार गट) यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर गेलो असतो, तर भरपूर निधी मिळाला असता.'', असे विधान केले आहे. त्यांनी हे विधान नगर जिल्ह्यातील राहुरीत केले आहे. खरंतर आमदार तनपुरे यांच्या या विधानाची दखल सत्तेत असलेल्या अजित पवार गट घेण्याची शक्यता आहे. परंतु आमदार तपनुरे हे शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्यावर ठाम आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Tanpure
Uddhav Thackeray News : ''तुम्ही मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारलाय, आता...'' उद्धव ठाकरेंचा थेट इशारा!

ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झालेले सरपंच आणि सदस्यांचा राहुरी येथे आमदार तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नारायण जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार तनपुरे यांनी हिंदुत्ववादी सरकारवर आणि पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित केलेल्याच्या प्रकारावर टीका केली.

आमदार तनपुरे म्हणाले, "मिरी-तीसगाव, बुर्हाणनगर पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. थकीत वीजबिल भरल्याशिवाय वीज जोडू नये. असे वरिष्ठांचे आदेश असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत आहे. या हिंदुत्ववादी सरकारने दिवाळीच्या सणात जनतेच्या तोंडाचे पाणी हिरावून घेतले आहे. जनतेला पाण्यासाठी दिवाळीत वणवण करायला लावली आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही.''

MLA Tanpure
Uddhav Thackeray Mumbra Visit: 'पोलिसांनी बाजूला व्हावं, आम्ही यांना बघतो..'; ठाकरेंचा शिंदे गटाला थेट इशारा

तसेच, ''रोजगार हमीच्या मजुरांना दोन महिन्यांपासून मजुरी मिळालेली नाही. यासारखे दुर्दैव नाही. गेल्या चार वर्षात भरपूर विकासकामे केली. ती मार्गी देखील लावली. आता सरकार बदलले आहे. यापुढे विकासकामांना मर्यादा येणार आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटला. काही जण सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी सत्ताधाऱ्यांबरोबर गेलो असतो, तर भरपूर निधी मिळाला असता. परंतु मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार केले. त्यांनी राज्यमंत्रीपदावर संधी दिली. त्यांना सोडणे कदापि शक्य नाही.'', असेही आमदार तनपुरे म्हणाले.

याशिवाय आमदार तनपुरे यांनी यावेळी 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे भाकीत केले. त्यावेळी पुन्हा सत्तेवर येईल आणि विकासकामांना वेग येईल, असे सांगितले.

तसेच ''ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता एकोप्याने काम करा. गावात राजकारण करत बसू नका. विकासकामांना प्राधान्य द्या. मतभेद विसरून कामाला लागा. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने नबंर एकची कामगिरी केली आहे. राष्ट्रवादीवर आणि शरद पवार यांच्यावर लोकांचा वाढता विश्वासाचे हे प्रतिक आहे.'', असेही आमदार तनपुरे म्हणाले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सरपंच अंबादास डमाळ, प्रभाकर गाडे, गोरक्षनाथ पवार, बाळासाहेब खुळे, रवींद्र मोरे, अरुण कल्हापुरे, विक्रम फाटक आदी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com