Manoj Jarange On Chhagan Bhujbal : भुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक; मनोज जरांगेंचा फडणवीस अन् अजितदादांवर थेट निशाणा...

Manoj Jarange Criticizes NCP Nashik MLA Chhagan Bhujbal Inclusion in Mahayuti Cabinet : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
Manoj Jarange On Chhagan Bhujbal
Manoj Jarange On Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti government ministers : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा समावेश करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्याकडचे खाते त्यांना देण्यात आले असून, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते सहभागी देखील झाले आहे.

भुजबळ यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या समावेशावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, "जातीयवादी लोकांना पुन्हा पद देऊन, अजितदादांनी मोठी चूक केली आहे. पण भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मंत्रि‍पदावर लवकरच विरजन पडेल. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांपुरती ही संधी देण्यात आली आहे. अजितदादांनी त्यांना तात्पुरते नादी लावलं आहे. एकप्रकारे चाॅकलेट दिलं आहे. त्यांना मंत्रिपद मिळो किंवा शपथ घेऊ द्या, आम्हाला काहीच फरक पडत नाही. त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे".

'आरक्षणामुळे मराठा (Maratha) मुलांना नोकरी मिळणार आहे. शिक्षण सोपं होणार आहे. याच सुविधा मिळाव्या नाहीत, यासाठी भुजबळ प्रयत्न करतात. विरोध असतो. जातीयवादी लोकांना पोसण्याचे काय परिणाम होतात, हे अजितदादांना आगामी काळात कळेल. भुजबळांना मंत्रिपद दिले म्हणून आमचा विरोध नाही. पण जातीयवादी लोक पोसण्याचे काम केवळ अजितदादा करत आहे, असा गंभीर आरोप देखील मनोज जरांगे यांनी केला. मराठा आरक्षणाचे मारेकरी अजित पवारांकडून सत्तेत जाणीवपूर्वक घेतले जाणार असतील, तर मराठ्यांना एकत्र राहावाचं लागेल', असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.

Manoj Jarange On Chhagan Bhujbal
Shrirampur Market Committee : श्रीरामपूरात विखे पॅटर्न; बाजार समितीतील नऊ संचालकांच्या राजीनाम्यानं खळबळ

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, "भुजबळ यांना मंत्री करण्याचे नाटक हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. भुजबळांना मंत्रिपद द्यावे, हे फडणवीस यांचेच म्हणणे होते. ओबीसी मतदानांसाठी हे 'शाळा' आहे". फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना ओएसडी दिले असल्याने कोणाचे काहीच चालत नाही. मराठा नेत्यांना संपविण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचा घणाघात देखील मनोज जरांगेंनी केला.

Manoj Jarange On Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: वाह फडणवीस वाह ! एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? दमानियांनी करुन दिली 'त्या' घोषणांची आठवण

अंजली दमानिया यांचा संताप...

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनी देखील छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "भुजबळ यांच्या विरोधात मी लढले, एफआयआर झाली, अडीच वर्षे ते जेलमध्ये होते. ते बाहेर येत असताना आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढलो. धनंजय मुंडेंची दहशत बाहेर काढली. मला जेव्हा आज कळले छगन भुजबळ यांचा शपथविधी होत आहे. तेव्हा मला खूप राग आला."

फडणवीस यांना दमानिया यांचा सवाल...

एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे? असा सवाल दमानिया यांनी फडणवीसांना केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com